नायगाव : तालुक्यातील आठ ग्रामपंचायती साठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुस-या दिवस अखेर सहा गावातुन ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर दोन गावातून एकही अर्ज प्रप्त नसल्याची माहीती नायबतहसीलदार लोणे यांनी दिली.
तालुक्यातील मरवाळी, कोपरा, सुजलेगाव, तलबिड, ताकबिड, पिपळगाव, आतंरगाव ,सातेगाव , रूई खु या गावच्या ग्रामपंचायती साठी जनतेतून सरपंच व सदस्या साठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असुन या साठी दि. २८ नोव्हेंबर पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरूवात झाली़ असुन येत्या २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्रितं केले असून दुस-या दिवस अखेर मरवाळी , कोपरा येथून सरपंच पदासाठी १ तर सदस्य साठी ११ ,आतंरगाव येथुन सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी ६, ताकबिड येथून सरपंच पदासाठी २ सदस्य १९, पिपळगाव येथून सरपंच पदासाठी २ तर सदस्यासाठी १० सातेगाव व तलबिड येथून एक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.
तर सुजलेगाव, रूई खु येथून एकही अर्ज दाखल झाला नाही . नायब तहसीलदार डि.डी.लोढे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, जी.बी.कानोडे, डी. आर. पोवळे, जी. बी. कळसे हे काम पहात आहेत.