नांदेड : पुन्हा एकदा कोरोनाची रूग्ण संख्या जिल्हयात वाढत आहे. दि.२४ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार ५५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ११ तर अॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ४४ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३० कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या १ हजार ९३४ अहवालापैकी 1 हजार ८७३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ३३९ एवढी झाली असून यातील २२ हजार ९१ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ४४१ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ११ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार २३ फेब्रुवारीला हदगाव येथील ६७ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५९५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १०, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १३, खाजगी रुग्णालय ७ असे एकूण ३० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ६, माहूर तालुक्यात ३, हिमायतनगर १, देगलूर १ असे एकुण ११ बाधित आढळले. अॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २७, भोकर तालुक्यात २, हदगाव १, माहूर ३, किनवट ५, बिलोली १, देगलूर १, लोहा 2, मुखेड १, नागपूर १ असे एकूण ४४ बाधित आढळले.
जिल्ह्यात ४४१ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५६, किनवट कोविड रुग्णालयात २२, हदगाव कोविड रुग्णालय ५, देगलूर कोविड रुग्णालय ५, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २२५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६२, खाजगी रुग्णालय ४१ आहेत. बुधवार २४ फेब्रुवारी २0२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १५९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ४९ एवढी आहे.
मंत्रालयातील गर्दी कमी होणार, कर्मचा-यांना शिफ्टप्रमाणे बोलावण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश