25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeनांदेडनांदेड शिक्षण विभागाच्या ५७ , अर्थ विभागाच्या ७ बदल्या

नांदेड शिक्षण विभागाच्या ५७ , अर्थ विभागाच्या ७ बदल्या

एकमत ऑनलाईन

नांदेड: जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत गट-क व गट-ड कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रियेच्‍या शेवटच्‍या दिवसी अर्थ शिक्षण व सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या समुपदेशनाव्‍दारे बदल्‍या करण्‍यात आल्‍या. यात शिक्षण विभागाच्या ५७ तर अर्थ विभागाच्या ७ अशा एकूण ६३ बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात बदली प्रक्रियेत जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उप मुख्‍य लेख व वित्‍त अधिकारी शेखर कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी बंडू अबदूरकर आदींची उपस्थिती होती. जिल्‍हा परिषदेच्‍या अर्थ विभागा अंतर्गत एकुण ७ बदल्‍या करण्‍यात आल्‍या. यात कनिष्‍ठ लेखा अधिकारी पदाच्‍या २ बदल्‍या झाल्‍या. यात प्रशासकिय १ तर विनंतीरुन एका बदलीचा समावेश आहे. वरिष्‍ठ सहाय्यक लेखा संवर्गात २ प्रशासकिय तर विनंती ३ बदल्‍या झाल्‍या.

शिक्षण विभागाच्या वतीने ५७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. यात २५ जणांना आदिवासी क्षेत्रात पदस्थापना देण्यात आली तर आदिवासी क्षेत्रातून इतर तालुक्यांमध्ये १३ आणि विनंतीने १९ बदल्या करण्यात आल्या. यात राजपत्रित मुख्याध्यापक ३, माध्यमिक शिक्षक उर्दू १, माध्यमिक शिक्षक मराठी ३७, शारीरिक शिक्षक १, शिक्षण विस्तार अधिकारी १५ अशा ५७ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या बदली प्रक्रिया उशिरा पर्यंत चालूच होत्या. शासन निर्णयाच्‍या निकषानुसार समुपदेशाने पारदर्शक बदली प्रक्रिया पार पाडल्‍यामुळे कर्मचा-यांनी समाधान व्‍यक्‍त केले.

लातूर जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार नागरिकांची कोरोना चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या