27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeनांदेडशिवाजीनगर पोलिसांकडून चोरीतील ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांकडून चोरीतील ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : रस्त्यावरून दोन ते तीन टन वजनाचे साहित्य चोरून हैद्र्राबाद येथे घेऊन गेलेल्या चोरट्याला शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत अवघ्या २४ तासात पकडले़ या चोरीतील ६ लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे.

नांदेड शहरातील विविध भागात सध्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. या कामांवर जेसीबी, लोकलेन, वाहने यासह अनेक मोठ्या वजनाचे साहित्य रस्त्यावरच ठेवलेले असते. प्रदीप किशन बाविसकर यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कंपनीचे एक पोकलेन नाईकनगर हद्दीतील चौकात रात्री ठेवलेले होते.

त्यातील २ ते ३ टन वजनाचे ब्रेकर कोणीतरी चोरून नेले. याबाबत दि़ ३० जुलै रोजी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचा-यांना तपासाचे आदेश दिले. प्राप्त माहितीनुसार चोरलेले साहित्य हैदराबाद येथे जात आहे. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे, पोलिस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलिस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देवसिंह सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे यांना हैदराबादला पाठवले. पोलिस पथकाने तेथून चोरलेल्या ६ लाखांच्या साहित्यासह किरण ज्योतिबाराव बल्लाळ रा. मनाठा ता. हदगाव यास अवघ्या २४ तासात पकडून नांदेडला आणले.

यासोबत गुन्ह्यात चोरीला गेलेला ६ लाखाचा मुद्देमाल अर्थात बे्रकर जप्त केला आहे. पकडलेल्या बल्लाळला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत पाठवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या