21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडनाल्यात वाहुन गेल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; वृद्धास वाचविण्या ऐवजी अनेकांनी केला...

नाल्यात वाहुन गेल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; वृद्धास वाचविण्या ऐवजी अनेकांनी केला व्हिडीओ

एकमत ऑनलाईन

नांदेड / मुक्रमाबाद : नाल्यात वाहुन गेल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना शनिवार दि.१२ जून रोजी खतगाव येथील एका नाल्याच्या पुलावर सायंकाळी घडली.दरम्यान हा वृद्ध वेगवान पाण्यातून पुल ओलांडतांना अनेकांनी मोबाईलवरून याचा व्हिडीओ केला पण त्यास वाचविण्याचे कोणीही सौजन्य दाखविले नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पहिल्याच मृग नक्षत्रात पावसाने नांदेड जिल्हयातील बहुतांशी भागात जोरदार हजेरी लावली.अजूनही काही भागात पाऊस होत आहे.यामुळे ग्रामीण भागातील नदी,नाले तुडूंब भरून वाहत आहेत.मुखेड तालुक्यात अशाच एका नाल्याला आलेल्या पुरात एकाचा बळी गेला आहे. शनिवारी दि.१२ रोजी सायंकाळी खतगाव (प.मु.) येथील विठ्ठल धोंडीबा माने वय ६५ हे शेतात शेळ्या चारून घरी परतत असताना मोठा पाऊस झाल्याने गावाच्या पुर्व बाजुला असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते.

तरीही ते पुलाच्या पाण्यातून काठी टेकवत पुल पार करित पुढे निघाले.मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने विठ्ठल माने हे थोडे पुढे जाताच प्रवाहात वाहुन गेले. दरम्यान सदर वृद्ध पुलावरून पुढे जात असतांना तेथे असलेल्या लोकांनी आरडाओरड करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.यांनतर उपस्थिता पेैकी अनेकांनी मोबाईलवरून त्यांचा व्हिडीओ केला पण त्यास वाचविण्याचे कोणीही सौजन्य दाखविले नाही.यामुळे संताप व्यक्त होत आहे. वृद्ध विठ्ठल माने यांचा मृतदेह तळ्याच्या कडेला आढळून आला आहे.

घटनास्थळी महसुल विभागाचे तलाठी मारोती श्रीरामे शेशिकांत तेलंग यांनी जाऊन पंचनामा केला. पुढील अहवाल तहसील कार्यालय मुखेड येथे पाठवून दिला आहे .गेल्या आठवडा भरापासुन मुक्रमाबादसह परीसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले वाहु लागले आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसिलदार काशीनाथ पाटील यांनी केला आहे.

भेटीगाठी व राजकीय समिकरणांची चर्चा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या