नांदेड : जिल्ह्यात आज २६ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ७२व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर २१व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण २४३ अहवालापैकी १६१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ३२४ एवढी झाली असून यातील६६९ एवढे बाधित बरे झाले आहेत. ५६२बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ४ महिला व ६ पुरुषांचा समावेश आहे. रविवार २६ जुलै रोजी भोकर येथील ५० वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ५७ एवढी झाली आहे.
आज बरे झालेल्या २१ बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील ५, बिलोली कोविड केअर सेंटर मधील २, कंधार कोविड केअर सेंटर मधील २, मुखेड कोविड केअर सेंटर मधील २, नायगाव कोविड केअर सेंटर मधील ५, गोकुंदा कोविड केअर सेंटर मधील १ व खाजगी रुग्णालयातील ४ बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण ६९३ बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.
नवीन बाधितांमध्ये पंचायत समिती परिसर नांदेड ८५ वषार्चा १ पुरुष, इतवारा येथील ६५ वषार्ची १ महिला, काबरानगर नांदेड येथील १९वषार्चा १ पुरुष, शिवशक्ती नांदेड येथील 10 बाधित यात अनुक्रमे ३,७,२५,३०,५२ वय वषार्चे ५ पुरुष तर अनुक्रमे १२,२५,२९,४२,४८ वय वर्षाच्या ५ महिला, एसपी आॅफीस परिसर ६० वषार्ची १ महिला, पाठक गल्ली येथील अनुक्रमे ७,२४,२८ वय वषार्चे ३ पुरुष, कलामंदीर नांदेड येथील २६ वषार्चा १ पुरुष, बाबानगर नांदेड येथील ३४आणि३६ वषार्चे २ पुरुष, एमजीएम कॉलेज परिसर येथील ३२ वषार्ची १ महिला, आशिर्वाद गार्डन परिसरातील ३७ वषार्चा १ पुरुष, मीलगेट येथील५९वषार्चा १ पुरुष, महाविर सोसायटी नांदेड येथील ३० वषार्चा १ पुरुष, जुना कौठा येथील ३० व ३४ वषार्चे २ पुरुष तर ५३ वषार्ची १ महिला, हडको नांदेड येथील ७३ वषार्चा १ पुरुष व ४५वषार्ची १ महिला, सिडको नांदेड येथील ६८ वषार्चा १ पुरुष, चौफाळा नांदेड येथील ३५वषार्चा १ पुरुष, सगरोळी बिलोली येथील ६२ वषार्चा १ पुरुष, मोहमंद नगर भोकर येथील ५० वषार्ची १ महिला, हदगाव येथील 38 वषार्चा 1पुरुष व ३५ वषार्ची १ महिला, तामसा येथील १८,२७,२८,३३ वय वषार्चे ४ पुरुष, शारदानगर देगलूर येथील २१वषार्चा १ पुरुष, ४०वषार्ची १ महिला, मुछी गल्ली देगलूर येथील ५७ वषार्चा १ पुरुष, रफिक कॉलनी येथील ५३ वषार्ची १महिला, सत्यमनगर देगलूर येथील २१वषार्चा १ पुरुष, हत्तीपुरा कंधार येथील ६५ वषार्ची १ महिला, नायगाव येथील ७२ वषार्ची १ महिला, कोलंबी येथील ३५ वषार्ची १ महिला, धमार्बाद येथील ३६ वषार्चा १ पुरुष,२० व ५४ वषार्चे २ पुरुष, फुलेनगर मुखेड येथील८वषार्चा एक मुलगा व २५वषार्ची १महिला, १५ व 35 वषार्चे २पुरुष, अनुक्रमे १२२८,५५ वर्षाच्या ३ महिला, ७० वषार्चा १ पुरुष, ६५ वषार्ची १ महिला, अंबुलगा येथील ३२व ३९ वर्षाच्या २ महिला, वडगाव येथील२२ वषार्चा १ पुरुष व ४१ वषार्ची १ महिला, जहूर येथील ५,७,२५ वय वर्षाच्या २ महिला, संतगाडगेबाबानगर येथील ६० वषार्ची१महिला, खरबखेड येथील ५५वषार्चा १ पुरुष, परभणी जिल्ह्यातील बरबडी येथील ८० वषार्चा १ पुरुष, गंगाखेड येथील ५० वषार्चा १ पुरुष हे सर्व आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे बिके हॉल श्रीनगर नांदेड येथील १६ व ४७ वषार्चे २ पुरुष बाधित आढळले. अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
Read More जि.प.शाळा बनली जुगाराचा अड्डा