19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeनांदेडकंधार ग्रामीण रुग्णालयात ७५ तासाचे लसीकरण अभियान

कंधार ग्रामीण रुग्णालयात ७५ तासाचे लसीकरण अभियान

एकमत ऑनलाईन

कंधार : कोरोनाशी सामना करण्यासाठी सध्या वेळेवर लसीकरण करुन घेणे हाच एक पर्याय उपलब्ध आहे यासाठी दि. २१ ते २३ अक्टों दरम्यान ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे किंवा ज्यांना घरातून केंद्रापर्यंत जाता येत नाही, अशा नागरिकांसाठी घरोघरी किंवा त्यांच्या परिसरात जाऊन मिशन कवच कुंडल अंतर्गत कंधार शहरातील प्रत्येक वार्ड निहाय कोविड-१९ लसीकरणाचे ७५ तासाची विशेष सत्र राबविण्यात येत आहे.

मा.जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी मंगळवारी घेतलेल्या श्उ मधील दिलेल्या सूचनेनुसार या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून यासाठी लागणारे अत्यावश्यक मनुष्यबळाचे ही नियोजन करण्यात आले आहे आरोग्य विभागाच्या मदतीसाठी महसूल विभाग ,शिक्षण विभाग, पंचायत समिती विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी ,विभागाचेही सहकार्य घेतले आहे.

मोहीम तीन शिफ्टमध्ये राबविली जात आहे त्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी, व वैद्यकीय अधीक्षक, समन्वय साधून शासनाच्या मार्गदर्शन पर सूचनेनुसार ७५ तासाचे हे विशेष लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी सिद्ध झाले आहे नगरपरिषद वीस हजार लसीकरणाचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे सलग ७५ तासाचे लसीकरण करण्याचे ठरवले आहे भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना पहिला डोस मिळावा म्हणून मिशन कुंडल कवच ७५ हे लसीकरण अभियान २१ ऑक्टों ते २३ अक्टो. पर्यंत कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात राबविण्यात येत आहे नागरिकांनी स्वयंस्फूतीर्ने पुढे येऊन कोविड लस घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर सर यांनी केले आहे.

वेगवेगळ्या अभियानातून ही लस सर्व नागरिकांनी दिली जावी हा उद्देश नागरिकांना दिले जावी हा उद्देश आरोग्य विभागाचा असून भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २१ ऑक्टों रोजी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत व रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत असेल लसीकरणाच्या व्यापक सहभागासाठी जिल्ह्यात ७५ तासाचे अभूतपूर्व सत्र माननीय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कुंडल कवच मिशन अंतर्गत जिल्हा प्रशासनासाठी आजपासून विशेष मोहीम मेला सुरुवात केली आहे कोविड-१९ जिल्ह्यातील नागरिकांनी बाळगलेली दक्षता आरोग्य विभागाने घेतली तत्परता आणि जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे कोरोना चा प्रसार मर्यादित ठेवण्यात यश मिळाले आहे.

तथापि अजूनही कोरोना चा धोका टळलेला नसून जिल्ह्यातील नागरिकांची यात जीवितहानी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे हे लसीकरण नांदेड जिल्ह्यातील सर्व भागात व शहरात महानगरापर्यंत प्रभावी करण्यासाठी या दृष्टीने दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी च्या सकाळी दहा पर्यंत अभूतपूर्व अशी ७५ तासाचे विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे .कंधार ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत कोविशीलड पहिला डोस-४६८६ ,२ री डोस २६९३ एकूण:-७३७९. कॉवक्सिन पहिला डोस-९२१४ ,२ री डोस ४०८६ एकूण:-१३३०० दोन्ही लसीचे एकूण प्रगतीपर पहिला डोस टक्केवारी ६०% तसेच दोन्ही लसीचे एकूण प्रगतीपर दुसरा डोस ४८% दोन्ही मिळून सर्व एकूण :-२०६७९ टक्केवारी ८७% दि. २० अक्टों. पर्यंत लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ७५ तास मोहिमेत ग्रामीण रुग्णालयातील २५ अधिकारी व कर्मचारी आहेत त्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यातील अधिकारी कर्मचारी या मोहिमेत मेहनत घेत आहेत तसेच आयुष्य विभातील वैद्यकीय अधिकारी यांनि पण सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वीपणे राबवण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला असून, नागरिकांनी त्याला प्रतिसाद देत सर्वांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सूर्यकांत लोणीकर यांनी केले आहे. राज्य शासनाने तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात मिशन कवच कुंडन मोहिम राबविण्यात सुरवात केली आहे.

या मोहिमेत सहभागी होवून आरोग्य विभागाने कंधार तालुका १०० टक्के लसीकरण कोरोना मुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. राहिलेल्या लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी मिशन कवच कुंडलचे आयोजन करण्यात आले असून, जे लोक लसीकरणापासून वंचित आहे अश्या नागरिकांसाठी प्रत्येक गावस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून राहिलेल्या लोकांनी त्यात सहभागी होऊन आपले लसीकरण करुन घेऊन आपल्याबरोबर आपल्या कुटूंबाचेही संरक्षण करणे अपेक्षित असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी ढवळे यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या