21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home नांदेड उद्या ९ जणांचा आत्मदहनाचा इशारा

उद्या ९ जणांचा आत्मदहनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

कंधार (विश्वंभर बसवंते) : कौठा ता.कंधार येथील ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग,दलित वस्ती, शौचालय, पाणी पुरवठा योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मागील दिड वर्षी पासुन तक्रार करुन पाठ पुरावा करत असताना देखील न्याय मिळत नाही. कंधार पंचायत समिती व जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होवूनही दोषींवर कार्यवाही होत नाही. तसेच तक्ररदाराला चौकशीचा अहवाला मिळत नाही.चौकशीचा अहवाल देवून तात्काळ भ्रष्टाचारातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत.अन्यथा नाईलाजास्तव आपल्या कार्यालयात खालील सहया करणार तक्रारदार दि. ३ डिसेंबर रोजी सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दि.२४ रोजी मुख्याधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहे.

कंधार तालुक्यातील कौठा ग्रामपंचायतीच्या सरपंच,ग्रामसेवक व पंचायत समितीच्या अधिका-्यांच्या संगनमताने १४ व्या वित्त आयोग दलित वस्ती,शौचालय,पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून सदरील बाब कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहित असून याबाबत त्यांच्याशी चेळोवेळी भेट घेवून तक्रार व निवेदने देण्यात आली होती. त्यांच्याबरोबर १२ मार्च २०२० रोजी जिल्हा परिषदेच्या समोर अमरण उपोषणही करण्यात आले होत.त्यावेळी कंधार पंचायत समितीने थातूर-मातूर चौकशी करुन जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला होता.त्या अहवालावर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कोडेकर यांनी नाराजी व्यक्त करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याच्या सुचना दिनांक १७ जुलै २०२० रोजी दिली होते.

कंधार पंचायत समितीच्या विस्तार अधिका-्यांकडून कुठलीही ठोस चौकशी न करता सदर प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न करत आहेत.कौठा येथील भ्रष्टाचारात ते ही सहभागी असल्याने ते स्वत:ला वाचवण्यासाठी लाखो रूपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही दिनांक १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.त्यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिका-्याने दिनांक १४ ऑगस्ट रोजी कौठा येथील भ्रष्टाचार प्रकरणाधी चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरुन ४ अधिका-्यांची समिती गठीत केली होती.

समितीने चौकशी करुनही जवळपास दोन महिन झाले.तरीही आजपर्यंत तक्रारदारास तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची माहिती मिळली नाही.त्यामुळे मुख्याधिकारी नांदेड यांना भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई करण्यात येण्याचे निवेदन दिले आहे.निवेदनाची प्रत वजीराबाद पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.या निवेदनावर ओमप्रकाश देशमुख,डॉ.नामदेव यन्नावार,बापूराव सोनकांबळे,माधवराव पारडे, देविदास घोरपडे,संजय पावडे,परमेश्र्वर हात्ते आदींच्या स्वाक्ष-या आहेत

लोदग्यातील अलमॅक टिशू कल्चर लॅबला भारत सरकारची मान्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या