32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात ९० नवे कोरोना रूग्ण

नांदेड जिल्ह्यात ९० नवे कोरोना रूग्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार ९०व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६५ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २५बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ५४ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या १ हजार२३१ अहवालापैकी १ हजार १३३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३हजार ७४४ एवढी झाली असून यातील २२हजार ३२९बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ६०१बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील २१बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

रविवार २८ फेब्रुवारी रोजी नंदिग्राम सोसायटी नांदेड येथील ६० वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर जुना कौठा नांदेड येथील ६५ वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ६००व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 38, कंधार तालुक्यांतर्गत १, देगलूर कोविड रुग्णालय १, हदगाव कोविड रुग्णालय २, खासगी रुग्णालय९ असे एकूण ५४ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.

बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ४३ हिमायतनगर तालुक्यात १, देगलूर २, किनवट ८, नांदेड ग्रामीण ५, हदगाव २, अधार्पूर २, हिंगोली २ असे एकुण ६५ बाधित आढळले. अ‍ॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १७, किनवट तालुक्यात २, नांदेड ग्रामीण २, देगलूर४ असे एकूण २५बाधित आढळले. जिल्ह्यात ६०१ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ४०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ६९, किनवट कोविड रुग्णालयात २५, मुखेड कोविड रुग्णालय ८, हदगाव कोविड रुग्णालय ६ महसूल कोविड केअर सेंटर ४५, देगलूर कोविड रुग्णालय १०, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २३२, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७३, खाजगी रुग्णालय ९३ आहेत.

३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’
कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी बुधवार ३१ मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या मधील तरतुदीनुसार १४ मार्च २०२० रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे.

तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (1) (३) अन्वये दि. १ मार्च२०२१ रोजीच्या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश३१ऑक्टोंबर, ४, १५ व २८नोव्हेंबर, ३० डिसेंबर २०२०आणि २९जानेवारी २०२१ मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात बुधवार ३१मार्च २०२१ पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करणा-्या सर्व अधिका-यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचा-्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. १मार्च २०२१रोजी निर्गमित केले आहेत.

इंटरनेट अभावी स्वस्तधान्य दुकानदाराची रानमाळात भटकंती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या