34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात ९०६ नवे कोरोना रुग्ण; २५ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ९०६ नवे कोरोना रुग्ण; २५ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ३ हजार ७ अहवालापैकी ९०६ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३२६ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५८० अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ४८ हजार ५७५ एवढी झाली असून यातील ३५ हजार ६४२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १० हजार ७५६ रुग्ण उपचार घेत असून २०४ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर , सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक २ ते ३ एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९२१ एवढी झाली आहे. दिनांक २ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यलय येथे देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील ६० वर्षाचा पुरुष, आसर्जन नांदेड ७६ वर्षाचा पुरुष, सुंदरनगर नांदेड येथील ६८ वषार्ची महिला, गुरुद्वारा परिसर नांदेड ४५ वर्षाचा पुरुष, हैदरबाग येथील ७४ वर्षाचा पुरुष, लोहा येथील ८५ वषार्ची महिला, देगलूर नाका नांदेड येथील ७१ वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे तामसा ता. हदगाव येथील ५७ वर्षाचा पुरुष, विकास नगर नांदेड येथील ६६ वषार्चा पुरुष, दिनांक ३ एप्रिल जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सहयोग नगर नांदेड येथील ८२ वर्षाचा पुरुष , विनायक नगर नांदेड येथील ७२ वर्षाचा पुरुष, वामन नगर नांदेड येथील ८६ वर्षाचा पुरुष, उमरी येथील ६३ वर्षाचा पुरुष, हडको नांदेड येथील ६७ वर्षाचा पुरुष, फेत्तेबरुज येथील ८० वषार्ची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे फंरादे पार्क येथील ४६ वषार्ची महिला, गणेश टॉकिज परिसर ६७ वषार्ची महिला, लोहा येथे वड्डेपुरी येथील ६५ वर्षाचा पुरुष, लोहा येथे ६० वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील ८६ वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय अरविंद नगर नांदेड येथील ८० वर्षाचा पुरुष, माहूर तालुक्यातील वडसा येथे ५५ वषार्ची महिला, यशोसाई कोविड रुग्णालय सिडको येथे ७२ वषार्ची महिला, आश्विनी कोविड रुग्णालय शारदा नगर नांदेड येथील ७५ वर्षाचा पुरुष, तिरुमल्ला कोविड रुग्णालय येथे शारदा नगर नांदेड येथील ७१ वषार्ची महिला असे एकूण २५ रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

आज रोजी १ हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी २०, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ६६३, कंधार तालुक्याअंतर्गत १६, किनवट कोविड रुग्णालय १०, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत १, बिलोली तालुक्याअंतर्गत २७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १८, उमरी तालुक्याअंतर्गत ३४, नायगाव तालुक्याअंतर्गत १, मुखेड कोविड रुग्णालय १६, देगलूर तालुक्याअंतर्गत ६, अर्धापूर तालुक्याअंतर्गत १५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १४, हदगाव कोविड रुग्णालय १०, माहूर तालुक्याअंतर्गत ६, धमार्बाद तालुक्याअंतर्ग ८, लोहा तालुक्यांतर्गत ३०, खाजगी रुग्णालय १२० असे एकूण १ हजार १५ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४६ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १९१, बिलोली २, हिमायतनगर १२, मुखेड १७, नांदेड ग्रामीण १०, देगलूर १, कंधार ९, नायगाव १६, अधार्पूर १४, धमार्बाद ४, किनवट १४, यवतमाळ १, मुदखेड १७, लोहा १७, हिंगोली १ असे एकूण ३२६ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३४३, बिलोली ४, कंधार ११, मुदखेड १६, परभणी २, नांदेड ग्रामीण १०, देगलूर २५,किनवट ४२ , मुखेड ३२, यवतमाळ १, अर्धापूर ७, हिमायतनगर ३, लोहा २६, नायगाव २१, लातूर १, भोकर १८, हदगाव ११, माहूर १, उमरी ५, औरंगाबाद १ असे एकूण ५८० व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.जिल्ह्यात १० हजार ७५६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १०६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) १९६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४०, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १४४, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३३१, देगलूर कोविड रुग्णालय ५०, नायगाव कोविड केअर सेंटर ९७, उमरी कोविड केअर सेंटर २९, माहूर कोविड केअर सेंटर २३, भोकर कोविड केअर सेंटर १६, हदगाव कोविड रुग्णालय ४४, हदगाव कोविड केअर सेंटर ६७, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२७, अर्धापूर कोविड केअर सेंटर १८, बारड कोविड केअर सेंटर १२, मांडवी कोविड केअर सेंटर ८, महसूल कोविड केअर सेंटर १६३, एनआरआय कोविड केअर सेंटर २७२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर २९७, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ७०९, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर ८९,बिलोली कोविड केअर सेंटर २२६, हिमायतनगर कोविड केअर सेंटर ११,कंधार कोविड केअर सेंटर ९९,धमार्बाद कोविड केअर सेंटर ७४, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण १ हजार ८९७ , खाजगी रुग्णालय १ हजार ३३९ असे एकूण १० हजार ७५६ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे ९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ६ खाटा उपलब्ध आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या