नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागच्या काही महिन्यापासून खंडणीच्या प्रकणात वाढ झाली आहे. शहरातील एका व्यापा-यांकडून खंडणीखोरांनी ९९ लाखाची खंडणी उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकणातील दोन खंडणीखोरांना अर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. दि. २१ मे रोजी शहरातील एका व्यापा-याने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांनी स्वत:च्या नावावर मनपा हद्दीत प्लॉट खरेदी केला होता.
तो प्लॉट नगर भुमापन व मनपा कार्यालयात त्यांनी आपले नावे परिवर्तन करून प्लॉटभोवती तारेचे कुंपण आणि सिमेंटचे खांब लावले होते. दरम्यान यातील नमुद आरोपी ओमस्ािंह दयालस्ािंह ठाकूर व त्याचे दोन साथीदार यांनी सन-२०१९ मध्ये बनावट सौदाचिठ्ठीचा आधार घेवून आपल्या ताब्यात असलेल्या प्लॉटवर चालूू असलेल्या बांधकामात अडथळा निर्माण करून फिर्यादी व त्यांच्या कुटूंबियाच्या जिवीतास व मालमत्तेस हानी पोहचविण्याची भीती दाखवून दहशत निर्माण केली. तसेच सदर व्यापा-याकडून आरोपींनी ९९ लाख रूपयांची खंडणी वसूल केली. यानूसार भाग्यनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
या खंडणी प्रकणातील आरोपी रव्ािंद्रस्ािंग लक्ष्मणस्ािंग जंगी रा. शहीदपूरा नांदेड व ओमसिंह दयालसिंह ठाकूर रा. जुनामोंढा इतवारा या दोन खंडणीखोरांना अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २२ मे रोजी अटक केली आहे. सदरची कार्यवाही विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबाळी, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थिक गुन्हे शाखेचे पोनि माणिक बेद्रे, सपोनि महादेव मांजरमकर, पोउपनि गोटके आदीनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि मांजरमकर हे करीत आहेत. दरम्यान या प्रकणातील फिर्यादी व्यापा-याचे नाव गोपनियतेच्या नावाखाली सांगण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.