हिमायतनगर : शहरातील परमेश्वर गल्ली येथे राहत असलेली जीवन डाके यांचे कोरो ना महामारी च्या आजाराने नुकतेच निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंब स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आभाळाएवढे दु:ख घेऊन सहकुटुंब शेतात विलीनीकरणासाठी राहायला गेले असल्याचे समजताच गावातील २ चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोने चांदी सह विमा बोंड व रोख रक्कम साडेतीन लाखांचा ऐवज चोरून त्यांचे अख्खं घर धुऊन नेले असल्याची घटना दिनांक ४ ते ५ दरम्यान परमेश्वर गल्लीतील मुख्य रस्त्यावर घडली या घटनेवरून बेशरम चोरट्यांनी मढ्याच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याने शहरातील नागरिकांतून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
दिनांक 2 एप्रिल रोजी हिमायतनगर शहरातील एका व्यक्तीचा कोरोणा महामारी च्या आजाराने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नांदेड मध्येच करण्यात आले घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने घरातील सर्व कुटुंब दु:खात असताना आपला जीव वाचवण्या साठी ते सह कुटुंब शेतातील आखाड्यावर स्वत:ला विलगीकरण नात ठेऊन राहत होते त्याच दरम्यान शहरातील तीन चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दिनांक चार एप्रिल रोज रविवारी रात्री त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घर लुटून नेले ही बाब शेजारील वैभव केंद्रे व किरण डाके यांच्या लक्षात येताच त्यानी त्यांच्या कुटुंबीयांना तुमच्या घरात चोरी झाल्याचे कळविले या घटनेत चोरट्यांनी त्यांच्या घरातील सामानाची नासधूस करत घरातील सोन्याचा हार तीन तोळे , मंगळसूत्र पोत दोन नग, ,सोन्याची चैन तीन नग ,एक लक्ष वीस हजार विमा कंपनीचे मुद्रांक व रोख रक्कम २५००० असे मिळून तीन लक्ष ९३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज शहरातील चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना घडल्यामुळे अगोदरच शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाच्या दु:खात वाढ झाली आहे.
या घटनेनंतर हिमायतनगर पोलिसात फियार्दी जय जीवन हेंद्रे वय १९ वर्ष राहणार परमेश्वर गल्ली हिमायतनगर यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध कलम 457 380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक परशुराम देवकते व बीट जमादार लपशे ट वार साहेब हे तपास करीत आहेत तर मागील महिन्याभरापासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे शहरात अगोदरच मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने ह्याचा फायदा घेऊन मुख्य रस्त्यावरील एक घर फोडून शहरातील पोलिसांना एका प्रकारचे चोरट्यांनी आव्हान दिले आहे.
भारत खरोखरच भाग्यवान देश; जागतिक बँकेच्या अध्यक्षांकडून गौरव