25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडबनावट पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

बनावट पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. किरकोळ गुन्हेगारही शस्त्राच्या धाकावर गुन्हे करत बिनदास्त फिरत आहेत. दरम्यान शहरातील कॅनॉलरोड भागातून बनावट पिस्टल बाळगून दहशत पसरविणा-या एकास भाग्यनगर पोलीसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे दहशत निर्माण झाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातही गुन्हेगार सर्रासपणे शस्त्राचा वापर केला लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना बेकायदेशीर हत्यार बाळगणा-याविरोधात कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोनि सुधाकर आढे यांच्या मार्गशनाखाली पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोंिलग करीत असताना दि. ११ रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास शहरातील कॅनॉलरोडवरील बसवेश्वर चौकात एका संशयीत व्यक्तीकडे पिस्टल असल्याची माहिती पोलीसांना मिळालीÞ त्यास पकडून पोलीसांनी सदर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक बनावट पिस्टल आढळून आले.

सदर व्यक्ती ते पिस्टल खरे असल्याचे भासवून लोकांना धमकावत समाजात दहशत निर्माण करत होता. पोलीस आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याच्याविरूद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोहेकॉ जाधव हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या