22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeनांदेडराष्ट्रवादीचे नेते खडसेंविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते खडसेंविरोधात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

नांदेड : बंजारा समाजाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेतÞ अखेर या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील एका मेळाव्यात, निवडणुकीच्या काळात बंजारा समाजाला २ किलो मटण, १ किलो बोटी, दारू दिले की दुसरे काही लागत नाही वक्तव्य खडसेंनी केले होते. खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल हे वक्तव्य केल्यानंतर खडसे यांच्याविरोधात बाजरा समाज आक्रमक झाला आहे.

नांदेड शहरात राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध करून खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या