26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडभोकर शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह : चिंता वाढली

भोकर शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह : चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

भोकर : येथील आरोग्य विभागाकडून पाठवण्यात आलेल्या ८ नागरीकांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ७ जण निगेटिव्ह तर एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाल्या मूळे आतापर्यंत बिनधास्त असलेल्या भोकरकरांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून तात्काळ या पॉझिटिव्ह रुग्णास कोव्हिड सेंटरमध्ये भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी दिली आहे.

दि.१८ जूलै रोजी तपासणी करीता पाठविण्यात आलेल्या येथील तिनही संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते . मात्र दि .२१ जुलै रोजी नांदेड येथील शासकिय प्रयोगशाळेकडे ८ जणांच्या स्वॅबचे नमुने पाठविण्यात आलेले होते. त्या आठही जणांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी सात जणांचा अहवाल निगेटिव्ह तर एका ५० वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.

सदरील रूग्ण शहरातील मंजुळा नगर भागातील रहिवासी असल्याचे कळते. या व्यक्तीस सौम्य कोरोनाचे लक्षणे असल्याने त्यास उपचारासाठी शहरातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक मुंडे यांनी सांगितले. दरम्यान संबंधीत रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कुटुंबियातील पाच सदस्याासही क्टावारंटाईन करण्यात आले असून त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे कळते.

उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार भरत सुर्यवंशी , मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून नागरीकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये असे अवाहन करण्यात आले आहे.

Read More  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कॉरन्टाईन लोकांवर उपासमारीची वेळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या