27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeनांदेडप्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या ; वाळकी बु. येथील घटना

प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या ; वाळकी बु. येथील घटना

एकमत ऑनलाईन

उस्माननगर/शिराढोण : उस्माननगर पोलीस स्टेशन अंर्तगत वाळकी (बु) येथे प्रेमी युगुलांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १८ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाळकी बु. ते कापसी रस्त्यालगतच्या विहिरीत दोन मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसुन आल्याने लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली.

याबाबत माहिती अशी की वाळकी ता. लोहा येथील कोमल श्रीकांत कोलते (वय १९) व धनाजी मुंकिद कोलते (२२) या दोघांचे प्रेमसबंध असल्याची माहिती ग्रामस्थांकडुन मिळाली. चार महिन्यापुर्वी कोमल हिचा विवाह करुन देण्यात आला होता. तरीही दोघांचे प्रेमसंबध सुरुच होते. दोघांतील भावकिचे नाते असल्यामुळे हे संबध अडसर ठरत होते. प्रेमसंबधामुळे दोघांचे प्रचंड दडपण होते., अशातच कोमल दिवाळीनिमित्त माहेरी आली होती .तेव्हा दोघांनी एकत्र जिवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत वाळकी बु. ते कापसी रस्त्यालगतच्या विहिरीत विहिरीत उडी टाकाली. मृतदेह विहीरीत तरंगत असल्याने ही घटना उघड झाली.

मृतदेह काढताना दुर्गंधी सुटली होती.यामुळे अंदाजे दोन दिवसापुर्वी हि आत्महत्या झाली असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत होते .दरम्यान धनाजी हा पदवीचे शिक्षण घेत होता तर कोमलचे बारावी पर्यतचे शिक्षण झाले होते दोघांचेही घरे एकमेकांच्या शेजारी असल्यामुळे प्रेमसंबध जुळुन आले होते. आत्महत्या करण्यापुर्वी दोघांनीही सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी स्वत:च्या ईच्छेनुसार आत्महत्या करत असुन दुस-या कोणालाही दोषी धरु नये असे लिहले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी दिली. यावेळी उस्माननगर पोलिस ठाण्याचे पि.बी थोरे, मोरे गायकवाड आदी उपस्थित होते.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या