18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडतलवार बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

तलवार बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरात शस्त्राच्या धाकावर जबरी चो-याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीसांनी एकास बेकायदेशीर तलवार बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारांना पोलीसांचे भय राहिले नसून, गुन्हेगार बिनदास्तपणे बेकायदेशीर विविध शस्त्र घेवून फिरत आहेत. वाढती गुन्हेगारी पोलीसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने, पोलीसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या विरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली. दरम्यान दि.१२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीसांना माहिती मिळाली की, नवी आबादी मगदुमनगर येथे एकजण बेकायदेशीर तलवार बाळगुन समाजात दहशत निर्माण करीत आहे.

ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी सदर ठिकाणी जावून एका आरोपीस तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला, असून अधिक तपास पोना शेख हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या