23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडगाडगेबाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल

गाडगेबाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा शहरातील श्री संत गाडगे बाबा प्राथमिक शाळेजवळील धोकादायक विद्युत पोल म.रा.वि. महावितरणने तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक मिंिलद पवार यांनी उपविभागीय अभियंता महावितरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महावितरणने चे दुर्लक्ष विधार्थाच्या जिवीतास धोका निर्मान झाला असुन तातकाळ दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात असे नमूद केले की लोहा शहरातील संत गाडगे बाबा प्राथमिक शाळे जवळील विद्युत पोल हा रहदारीच्या मार्गावर असून सदरील विद्युत पोल हा खराब झाला असून मोडकळीस आला आहे. तो विद्युत पोल लोखंडी असल्यामुळे त्यांच्यापासून जीवीत हाणी होण्याची शक्यता आहे. त्यासंबंधी महावितरणच्या कार्यालयाच्या कर्मचा-यांच्या कानावर घालून सुद्धा अद्याप पर्यंत सदरील पोल दुरुस्त करून दिलेला नाही. भविष्यात काही अपघात झाल्यास त्यांची सर्वश्री जबाबदारी महाविरण कार्यालयाची राहील तेव्हा तात्काळ हा पोल दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या