28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडनाल्यात वाहून शेतक-याचा मृत्यु

नाल्यात वाहून शेतक-याचा मृत्यु

एकमत ऑनलाईन

किनवट : गेल्या दोन दिवसापासून किनवट तालुक्यामध्ये संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात जागलीला जाणा-या एका शेतक-याचा वाहून जावून मृत्यु झाला़ ही घटना दि़ ११ रोजी रात्री डोंगरगाव येथे घडली.

मल्हारी महिपती मेंढे हा शेतकरी आपल्या शेतात जागलीसाठी जात असताना नाल्याच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावला आहे. किनवट तालुक्यात पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले असून दिनांक ११ सप्टेंबर रोजी जलधरा मंडळात दिवसभर संततधार पाऊस झाला़ या पावसामुळे नदी,नाल्याला पूर आला आहे. रात्री अकराच्या सुमारास डोंगरगाव (ची) येथील शेतकरी मल्हारी महिपती मेंढे वय ४२ हे गावातून जेवण करून शेतावर जागरण करण्यासाठी निघाले होते.

रस्त्यात असलेला नाला ओलांडून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले़ दुस-या दिवशी दि़ १२ रोजी सकाळी गावाजवळील काटयाकुटयात अडकलेला त्याचा मृतदेहच सापडला़ यामुळे गावक-यांना धक्का बसला़ प्राथमिक आरोग्य केंद्र जलधारा येथे डॉ. वाडेकर यांनी शवविच्छेदन केले. पोलीस जमादार बाळासाहेब पांढरे यांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

या मयत शेतक-यास पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. कर्ता पुरुष गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. यामुळे मयताच्या वारसास नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी माजी उपसभापती खंडेराव मोदे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोळंके, माजी सरपंच बामनाजी मेटकर यांनी केली आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या