कंधार : कंधार तालुक्यातील उमरज येथील शेतकरी विश्वनाथ भाऊराव सांगवे हे शेतात वैरण घेण्यासाठी गेले असता, रानडुकाराने हल्ला केला. त्यात विश्वनाथ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
सध्या शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. जंगली जनावरांचे प्रमाण परीसरात जास्त आहेत.वनविभागाकडून लक्ष देण्याची गरज असतांना वनाधिकारी कधीही या परीसरात फिरकत नाहीत. हिंस्र प्राण्यांपासून सचिव करण्यासाठीची कधी माहितीही शेतक-यांना देत नाहीत.त्यामुळे जंगली प्राण्यांकडून शेतक-यांवर दरवर्षी हल्ले होतात. यात शेतकरी जखमी होतात.या ंिहस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
उमरज ता.कंधार येथील शेतकरी विश्वनाथ भाऊराव सांगवे हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतातील जनावरांसाठी वैरण घेण्यासाठी गेले असता दडून बसलेल्या रानडुक्कराने हल्ला केला.या हल्ल्याने विश्वनाथ यांच्या हातावर,पायावर जखमा झाल्या आहेत.