24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडलोहा शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

लोहा शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

एकमत ऑनलाईन

लोहा : चहा करित असतांनाच घरातील गॅस सिलेंडरचा भिषण स्फोट झाल्याची घटना गुरुवारी जुन्या शहरात घडली.या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून खाक मात्र सुदैवाने जीवितहाणी टळली.या घटनेत जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की,जुन्या लोह्यातील बडेसाब भातनासे वय ४५ वर्ष राहणार नवी आबादी हे गुरूवारी सकाळी नेहमी प्रमाणे चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेले. चहा करण्यासाठी गॅस पेटवला तोच काही वेळातच गॅस सिलेंडरचा अचानक भिषण स्फोट झाला.यात सिलेंडच्या चिंधड्या उडून लागलेल्या आगीत घरातील सर्व अत्यावश्यक साहित्य कागदपत्रे ,दागदागिने ,टिव्ही,कापडे हे सर्व जागीच जळून खाक झाले आहे. सुदैवाने या स्फोटात जीवीत हाणी झाली नाही.

मात्र आगीत जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे. बडे साब कुरेशी हा मजुरीचे काम करतो. त्याला लहान पाच मुली आहेत . या घटनेमुळे बडेसाब यांचा संसार उघड्यावर आला आहे.याची दखल घेत शहरातील काही दानशूर व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला असून उपनगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक नबीभाई शेख,करीमभाई शेख, नगरसेवक केशवराव मुकदम,श्याम पवार, पोलिस निरीक्षक संतोष तांबे, आदींनी सहकार्य केले. ही घटना कळताच उपजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर,नायब तहसीलदार अशोक मोकले, पोलिस निरीक्षक संतोष तांबे,उपनगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक नबीभाई शेख,करीमभाई शेख, नगरसेवक केशवराव मुकदम,श्याम पवार, युनूस शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली.

कुष्णूर जुगार अडडा प्रकरण : ठाणे प्रमुख अडचणीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या