16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeनांदेडभाजप कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष : खा. चिखलीकर

भाजप कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष : खा. चिखलीकर

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आली होती यावेळी अनेक रस्ते व खड्डे पडलेले होते, परंतु हे सर्व रस्त्यावरील खड्डे शिवसेना भाजपा सरकारने बुजवले हे आम्ही कर्तव्य म्हणून केले तर उपकार म्हणून नाही असा हा भाजप पक्ष आहे. भाजपात कार्यकर्त्यांना समानसंधी दिली जाते या पक्षात काम करणा-या कार्यकर्त्यांची कदर केली जाते. कामाची नोंद घेणारा हा पक्ष आहे असे मत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.

कुंडलवाडी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवनियुक्त प्रशासकीय चेअरमन व संचालक मंडळाच्या भव्य सत्कार सोहळा व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर तर प्रमुख पाहूणे जिल्हाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.राम पाटील रातोळीकर माजी. आ. सुभाषराव साबणे, गणेशराव पाटील करखेलीकर, अनिल पाटील बोरगावकर, माणिकराव लोहगावे, माधव अण्णा साठे, यादवराव तुडमे, रवी अण्णा पोतगंटीवार, श्रीनिवास पाटील नरवाडे, व्यंकटराव पा.गुजरीकर,यशवंतराव गादगे, उमाकांत गोपछडे, शांतेश्वराव पाटील लघुळकर, शंकरराव काळे, शंकरराव परसुरे, विश्वनाथ समंत, मारोती राहीरे, दत्तराम बोधने, राजू गादगे, रामदेव पाटील, शंकरराव परसूरे, शेख रहीम पटेल, सुधाकरराव कंन्ने, मारोती दगडे, बाबूराव खेडे, सत्कार मुर्ती डॉ.विठ्ठल कुडमूलवार, संतोष पाटील शिवशेट्टे, प्रल्हाद गायकवाड, पंढरीनाथ दाचावार, सय्यद ईस्तेहाख पंढरी पुपलवार, साईरेड्डी पुपलवार आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या