24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्राइमधनेगावात पोलिसांचे घर फोडले; १३ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

धनेगावात पोलिसांचे घर फोडले; १३ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज किमान दोन ते चार घरफोडी, जबरी चोरी, दरोडे अशा घटना घडत आहेत. दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतही धनेगाव येथील पोलिस वसाहतीतील चोरट्यांनी पोलिसांचे घर फोडून १३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे असलेल्या पोलिस वसाहतीतील पोलिस अंमलदार ज्ञानोबा कोंडिबा नाईकवाडे यांच्या घरी चोरी झाली.

दि. १९ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी लॉकर तोडले आणि त्यातून १३ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरनं ५६८/२०२२ गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नरवटे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या