29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeनांदेडपार्डी येथे भरधाव ट्रक घरात घुसला, तरूणीचा मृत्यु

पार्डी येथे भरधाव ट्रक घरात घुसला, तरूणीचा मृत्यु

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या घरात घुसला़ या अपघातात घरामध्ये असलेल्या एका तरूणीचा मृत्यु झाला़ तर घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचा चुराडा घाला़ सदर घटना वारंगा- नांदेड रस्त्यावरील पार्डी म़ येथे सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली़ ऐन घटस्थापनेच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

अर्धापूर तालुक्यातील पार्डी म़ येथे सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान भरधाव ट्रक एका घरात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. देळुब येथून पार्डीमार्गे एमएच २६ बीई ९१९३ हा ट्रक निघाला होता़ पार्डी येथे येताच भरधाव वेगातील ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून अचानक रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या माणिकराव मदने यांच्या घरात घुसला. या अपघातात घरात असलेली त्यांची मुलगी वर्षां माणिकराव मदने (२१) ही गंभीर जखमी झाली़ तातडीने तिला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

या अपघातात घरासमोरील दोन दुचाकींचा चुराडा झाला तर घराचे ही मोठे नुकसान झाले़ ऐन घटस्थापनेच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे़ या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउपनि कपील आगलावे, पोउपनि साईनाथ सुरवशे महेंद्र डांगे आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून सदर ट्रक व चालक ताब्यात घेतला़ या प्रकरणी अर्धापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोउपनि सुरवशे यांनी दिली़

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या