22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडशहरात चोरट्यांचा धुमाकुळ; सोन्याचे दोन गंठन लंपास

शहरात चोरट्यांचा धुमाकुळ; सोन्याचे दोन गंठन लंपास

एकमत ऑनलाईन

नांदेड: जिल्ह्यात चो-यांचे सत्र सुरूच असुन मागील दोन दिवसात शहरात दोन सोन्याचे गंठन जबरी चोरून नेल्याच्या घटना घडल्या. या घटनेमुळे नागरीकात भीतीचे वातावरण पसरले असुन, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहील्या घटनेत फिर्यादी सारीका रविंद्र शेळके रा. कृष्णनगर डी मार्टजवळ नांदेड ह्या दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरापासुन ते नृसिंह चौक धाब्याकडे मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांचे पाठी मागुन तीघेजन दुचाकीवर आले. त्यांनी तोंडाला मास्क व रूमाल बांधले होते. त्यांनी दुचाकीवर येवुन फिर्यादी महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठन जबरी हिसकावुन चोरून नेले. या प्रकरणी सारीका रविंद्र शेळके रा.कृष्णनगर यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुस-या घटनेत हिंगोली गेट उड्डाणपुलावरून खाली उतरणा-या एका महिलेचे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी जबरी तोडून नेल्याची घटना घडली. ज्यात सदर महिला जखती झाल्याने त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्यासुमारास एक महिला पायी चालत हिंगोली गेट उड्डाणपुलावरून अण्णाभाऊ साठे चौकाकडे जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळ काढला. या घाई गडबडीत महिला खाली पडली, ज्यात ती महिला जखमी झाली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरील लोकांनी सांगितल्याप्रमाणे हे चोरटे महिलेचे गंठण तोडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे उतरले आणि उजवीकडे गाडी वळवून पुन्हा हिंगोली गेट उड्डाणपुलाच्या खालून गेले आहेत. पोलीसांकडे माहिती घेतली असता वृत्तलिहिपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असुन सीसीटीव्हीची तपासणी करून शोध घेणे सुरू आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे महिलेचे गंठण चार तोळ्याचे होते. दरम्यान शहरात गुन्हेगारी, लूटमार, चोरी आशा प्रकरणात वाढ झाली असुन, या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी नागरीकांतुन होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या