21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडसावरी येथे वाघाने पाडला वासराचा फडशा

सावरी येथे वाघाने पाडला वासराचा फडशा

एकमत ऑनलाईन

किनवट : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे सावरी येथे शेतात बांधून असलेल्या गाईच्या ६ महिन्यांच्या वासराचा वाघाने फडशा पाडून जंगलात नेऊन फस्त केल्याची घटना रविवार दि. ७ ऑगष्ट रोजी पहाटे घडली.

किनवट तालुक्यातील सावरी येथील शेतकरी प्रकाश गिनाजी फड यांच्या शेत सर्व्हे नंबर १२४ मध्ये त्यांचा जनावराचा गोठा आहे. त्या गोठ्यावर दिनांक ६ ऑगष्ट रोजी सायंकाळी जनावरे बांधून घरी आले असता त्या जनावरातील ६ महिण्याच्या गाईच्या गो-यास वाघाने दिनांक ७ ऑगष्ट रोजी पहाटे मारून त्यास जंगलात नेवून फस्त केल्याची घटना घडल्याने सावरीसह परीसरातील नागरीक भयभित झाले आहेत. वाघाने फस्त केलेल्या वासराची बाजार भावाप्रमाणे अंदाजे २० हजार रुपये किमंत होती. हे शेतक-यांचे नुकसान झाले असून वन विभागाकडून त्वरीत पंचनामा करुन त्याची नुकसान भरपाई द्यावी व वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या