26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडधान्या अभावी कुटूंबावर उपासमारीची वेळ

धान्या अभावी कुटूंबावर उपासमारीची वेळ

एकमत ऑनलाईन

वाढवणा बु : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत़ या मुळे सर्व पोटावर हात असणा-या कुटूंबाची दयनीय अवस्था झाली आहे़ केंद्रशासना तर्फे देण्यात येणारा जुलै महिन्याचा मोफत धान्य गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

केंद्रशासना तर्फे कुटूंबातील एका व्यक्तीस ५ किलो धान्य व शिधापत्रिकेला एक किलो चना डाळ असा उपक्रम देशात राबविले जात असून, महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकरी शेतमजूर कामगार विधवा परित्यक्ता यांना अंतोदय ,अन्नसुरक्षा या सर्व शिधाधारकाना केंद्र सरकारच्या वतीने व्यक्तीस महिना ५ किलो मोफत धान्य दिले जात असुन तीन महिने मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळाले.

मात्र या महिन्याचे धान्य मिळाले नसल्याने गोरगरीब शिधाधारक कुटूंबाचे हाल होत आहेत़ कांम नाही हातात पैसा नाही मोफत धान्य मिळाले तर थोडी फार सवलत होत असल्याची चर्चा पण होताना दिसत आहे़ संबधित पुरवठा विभागाने लक्ष घालुन त्वरित जुलै महिन्याचे केंद्र सरकारने दिलेल्या धान्य कोठा वितरित करून गोरगरिबांची होणारी गैर सोय दूर करून उपासमारीपासून बचाव करावे अशी मागणी वाढवणा ग्रामस्थांकडून होत आहे.

Read More  आई- वडिलांना भेटण्यासाठी चाललेल्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या