18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडसख्खा भाऊ झाला पक्का वैरी, लहान भावाने मोठ्यास विष पाजले

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, लहान भावाने मोठ्यास विष पाजले

एकमत ऑनलाईन

नांदेड : शेतीचा वाद विकोपास गेल्याने लहान भावाने पत्नी व मुलाच्या मदतीने मोठ्या भावास जीवे मारण्याच्या हेतूने जबरदस्तीने विष पाजले. ऐन दिवाळीत सख्खा भाऊच झाला पक्का वैरी झाल्याची घटना मौ़ रायखोड येथे घडली. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी कुटूंबातील लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड व सुर्यकांत माधवराव आलेवाड दोघे राहणार मौ.रायखोड ता. भोकर या सख्ख्या भावात काही दिवसांपासून वडीलोपार्जीत शेतीचा वाद होता.दि. २२ ऑक्टोबर रोजी मोठा भाऊ लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड हा आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली बसला होता. दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान लहान भाऊ सुर्यकांत माधवराव आलेवाड,त्याची पत्नी गोदाबाई सुर्यकांत आलेवाड व मुलगा देवराव सुर्यकांत आलेवाड यांनी भावाशी शेतीच्या पैशाबाबत वाद घातला. यावेळी मोठ्या भावाने मी पंचासमक्ष तुला १५ लाख रुपये दिले आहे. त्यामुळे आता मी तुझे काहीही देणे नाही, असे सांगीतले. परंतू लहान भावाने मोठ्या भावाचे काही एक ऐकूण घेतले नाही व हा वाद विकोपाला गेला.

यातून लहान भाऊ, त्याची पत्नी व मुलाने लक्ष्मीकांत यांना दाबून धरून जबरदस्तीने विष पाजले़ ते बेशुद्ध पडत असल्याचे पाहून ते तिघेजण पसार झाले. काही वेळाने झालेला प्रकार लक्ष्मीकांत यांच्या कुटूंबियांना कळताच त्यांनी तात्काळ भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे प्रथमोपचार करुन अधिक उपचारार्थ त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविले़ योग्य वेळी उपचार मिळाल्याने सुदैवाने ते बचावले. पीडित शेतकरी लक्ष्मीकांत माधवराव आलेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीसात लहान भाऊ, त्याची पत्नी व मुलगा या तिघांविरुद्ध गुरनं ४०५/ २०२२ कलम ३०७,५०४,५०६,३४ भादंवि प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शेतक-याच्या घरी व घटनास्थळी भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांनी भेट दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या