19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home नांदेड ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर येथील तरुण रेल्वे कर्मचाऱ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर येथील तरुण रेल्वे कर्मचाऱ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : तालुक्यातील जळगाव ते तामसा जाणाऱ्या रोडचे काम एका खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या ठेकेदाराकडून केले जात आहे ठेकेदार व कामाची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे हिमायतनगर येथील एका तरुण रेल्वे कर्मचार्‍यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याचे खळबळजनक घटना आज सकाळी घडली अनिल नरवाडे वय 35 हे मयत तरुण रेल्वे कर्मचाऱ्यांचे नाव आहे या प्रकरणी कंपनी वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मयत कुटुंबाच्या नाते वाईकांची मागणी आहे

तालुक्यातील जवळगाव ते तामसा रोड चे काम मागील अनेक दिवसा पासून चालू असून जागोजागी फुल व अर्धवट रस्ते केले असून दोन वर्षाच्या काळात एकही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही तसेच पुलाचे काम सुरू असताना करण्यात आलेल्या रस्त्याचे कामही थातूरमातूर केल्या गेले आहे पावसाळ्यात अनेकदा या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याचे दि सल्याने येथील मार्ग अनेक वेळा बंद पडला होता पावसाळ्यानंतर पुलाचे काम सुरू करण्यात आले पण वाहनधारकांना वळण रस्ता नसल्याने कुठून जावे, कसे जावे हे कळायला भाग पडत नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूचना फलक लावण्यात आलेले नाही त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात येथे रोज होत आहेत.

जेव्हा वाहन वळण रस्ता उतरतो त्या ठिकाणी खोल मध्ये एक छोटासा बोर्ड लावला असल्याचे तो बोर्ड दिसत नसल्याने अनेक अपघात घडत असल्याचे तिथे जमलेल्या नागरिकांनी सांगितले आहे त्यामुळे या कामात हलगर्जीपणा दाखवलेल्या कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मयत कुटुंबाच्या घरच्या ना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

जन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या