36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडअबब...माहुर-किनवट रस्त्यावर धावतात रेतीच शेकडो वाहने

अबब…माहुर-किनवट रस्त्यावर धावतात रेतीच शेकडो वाहने

एकमत ऑनलाईन

वाईबाजार : परिसरातील लांजी या रेती घाटाचा लिलाव पार पडला असून आत्तापर्यंत अवैध रेती वाहतूक उपसा व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माहुर-किनवट रस्त्यावर दररोज रेतीची शेकडो वाहने आहेत.तर गुंतलेली रक्कम वसूल करण्यासाठी एकाच रॉयल्टीवर काही जण तीन तीन ट्रिपा मारत आहेत. कमी वेळेत भरगच्च पैसे मिळत असल्याने या व्यवसायाकडे राजकीय मंडळी वळली आहे.यामुळे महसुल विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.

माहूर तालुक्यातील फक्त तालुक्यातील लांजी घाटाचा शासनाने, प्रशासनाने लिलाव केल्याने रेती सहज उपलब्ध होत आहे.माञ ठिय्याधारकांनी बोलीमध्ये गुंतवलेली रक्कम वसूल करण्याकरिता वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती भरुण तसेच रुग्णवाहीकेपेक्षा हि जास्त गतीने धावत असल्याचे दिसत आहे. तर एकाच रॉयल्टीवर तीन ते चार ट्रिपा मारले जात असल्याचे रेती व्यवसायात असलेल्या मंडळीकडून बोलल्या जात आहे.वाई बाजार येथील जुन्या बसस्थानकावरून दिवसा गणित किमान तीनशे ते चारशे रेतीने भरलेल्या गाड्या धावत आहेत तर इतर परिसरात काय अवस्था असेल हे बोललेले बरे.

याशिवाय तालुक्यातील नदी नाल्यातून अवैध रेती उपसा करून शहरात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. याचा कोणताही लाभ झालेला नसतो त्यामधून शासनाला मिळणारी रॉयल्टी महसूल बुडत आहे.अवैध रेती तस्करी थांबवण्याठी नदीपाञात राञीच्या काळोखात उढी घेवून रेती माफीयावर कार्यवाहीचा बडगा उचलणारे तलाठी तसेच पथक प्रमुख तहसीलदार राकेश गिड्डे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकातून होत आहे.

कुंडलवाडीत विना मास्क फिरणा-या ३१ जणांवर कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या