25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडअबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री

अबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री

एकमत ऑनलाईन

वाई बाजार (प्रशांत शिंदे) : कोरोना पार्श्वभूमीवर कडक निबंध सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. हॉटेल व्यवसायिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत फक्त जेवण पार्सल सुविधाच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.असे असतांना येथील बिअर शॉपी मालकांना वेगळे नियम लावण्यात आले का ? असा सवाल उपस्थित होवून बिअर शॉपीमधून देशी व विदेशी दारु विक्री सुरू असल्याचे नागरिकांमध्ये आच्चर्य व्यक्त केले जात आहे. तथापी माहुर – किनवटच्या महामार्गावरील ह्या बिअर शॉपी मध्ये मात्र सर्रास अवैधरीत्या दारु विक्री सुरू आहे. येथे रात्री उशीरा पर्यंत राजरोश पणे कुठलिही भीती नबाळकता ही विक्री सुरू असते लॉकडाउनच्या काळात इतर ठिकानी दारू मिळत नसल्याचा फायदा घेत सदर ठिकाणी देशी व विदेशी दोन्ही प्रकारचे दारु चढ्या भावाने विक्री केली जात आहे.

विशेष म्हणजे सदर बिअर अ‍ॅड वाईन शापी असुन नावात सुद्धा बदल करुन बियर शॉफ केले असुन ग्रामस्थांची दिशा भुल करण्यात येत आहे.माहुर -किनवट मुख्य रस्त्यावर असून देखील सर्वा समोर हा प्रकार येथे सुरू असूनही या बाबत पोलीस व दारुबंदी खाते यांचे याकडे लक्ष जात नाही का ? अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे का ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. एकीकडे कोरोना संसर्ग रोगाच्या पाई सर्वसाधारण व्यापारी आपली दुकाने दिवसभर बंद ठेऊन आपले नुकसान होत असताना देखील प्रशासनास सहकार्य करीत आहेत, असे असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास नक्कीच कमी होईल हे सांगण्या योग्य नाही. करिता संबंधीत यञनेने या बिअर शॉपीची झडती घेवून उचीत कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चा होत आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमाची अंमलबाजवणी करण्यासाठी सिंदखेड पोलिस प्रशासनान दिवसाचे राञ करीत गांव,तांड्यात,वस्तीत जनजागृती करीत आहे व नियमाचे उल्लघणन करणार्‍यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशार सुध्दा देत आहेत.तरी सदरील बिअर शॉपी मालकावर याचा परिणाम झालेला दिसुन येत नाही. बंदी असो की नसो ३६५ दिवस विनापरवानगी कायद्याचा धाक न ठेवता येथे दारु विक्री सुरू असते. इतक्या मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा या बिअर शॉपीचे मालक मिळवतो कुठून पोलीस यंत्रणा दारु बंदी विभाग,एल.सी. बी. विभाग यांचे या प्रकाराकडे जानुनबुजुन कानाडोळा तर नाही ना? असा प्रश्न पडला आहे.

सदरील प्रकारा बाबत दि. ११ एप्रिल रोजी दै.एकमतला बातमी प्रसिद्ध होताच आमच्या प्रतिनिधीशी येथिल बिअर शॉपी मालकाच्या नातेवाहीकाने चर्चा करतांना आमच्याकडे प्रमानातच देशी दारुच्या पेट्या असून आम्ही १२० रुपये दराने प्रति नग विक्री केली असल्याची माहीती आमच्या प्रतिनिधीला दिली असल्याने सदरील बिअर शॉपी मधून बियरसह, देशी व विदेशी दारु विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले असून सदरील बिअर शॉपी मालकावर कार्यवाही होईल का ? या कडे वाई बाजार परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या