23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडनिकृष्ठ कामाप्रकरणी गुत्तेदारास जल संपदाविभागाकडून अभय

निकृष्ठ कामाप्रकरणी गुत्तेदारास जल संपदाविभागाकडून अभय

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : धर्माबाद तालुक्यातील कारेगावफाटा परिसरातील कॅनॉलच्या कामात अतिशय दर्जाहीन सीमेंट नाले बांधण्यात आले असून अतीशय सौम्य व हलक्या पावसानेच त्यातील सीमेंट व बांधकाम उखडून जात असून याबाबत कारेगावच्या शेतक-यांनी उपरोक्त कामाचे जीपीएस फोटो,लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड सादर केले. तरी देखील जलसंपदा विभागाने गुतेदारावर कोणतीही सक्षम कार्यवाही केली नसून तात्पुरती सूचना देऊन थातुरमातुर कामाचे मूल्याकन करण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप तक्रारदार शेतकरी करीत आहेत.

उपरोक्त कॅनॉलचे काम प्रदीर्घ कालावधीनंतर व सातत्याने पाठपुरावा केल्याने मंजूर करण्यात आले. या परिसरातील शेतीला सदरील पाण्यामुळे मोठा लाभ मिळण्याचा अशावाद शेतक-यांना होता. सदरील कामाचे टेंडर घेतलेल्या गुतेदाराकडुन निकृष्ठ दर्जाची कामे झाल्यामुळे अगदी हलक्या व सौम्य पावसाने उपरोक्त नाल्याच्या कामाचे मटेरियल उघडे पडले आहे. साधारणता सुमारे १० वर्ष तरी हे काम टिकेल असा अंदाज होता पण पहिल्याच वर्षातल्या पावसाळ्यात दर्जाहीन कामामुळे उपरोक्त कॅनॉलच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत.

स्थानिक पातळीवर शेतक-यांनी काम चालू असताना वारंवार हा प्रकार जपसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिला पण त्यात सुधारणा करण्याऐवजी हाच प्रकार रेटून नेण्यातच धन्यता मानण्यात आली त्यामुळे शेतक-यांच्या वतीने बाबाराव जगदंबे,शिवाजी जगदंबे, पांडुरंग जगदंबे आदी शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत संबंधित विभागाच्या प्रमुखांना तंबी देताच केवळ औपचारिकता म्हणून गुतेदारास तोंडी सूचना दिली पण कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही त्यामुळे निकृष्ट दर्जाचे झालेल्या या कामाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही होईपर्यंत उपरोक्त कामाचे देयके अदा करण्यात येऊ नये अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या