नरसीफाटा : गावातच राहणा-या एका मुलीला लग्नाने अमिष दाखवून मागिल आठ वर्षापासून शारीरिक संबंध ठेवत लग्न करण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरुध्द नायगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन एका आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नायगाव शहरातील मटका किंग असलेला व अनेक वेळा गुन्हे दाखल झालेला अब्दुल मतीन अ.सलीम यांने गावातील एका मुलीसोबत सुत जुळविल. सदर मुलीसोबत आरोपीने लग्न करतो असे सांगुन मागील आठ वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले .
सदर महीलेने लग्नासाठी मतीनकडे मागणी करत होती पण तो तीस लग्नास नकार देत तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
सदर महिलांनी दि.२९ रोजी नायगाव पोलीस स्टेशन गाठून मला अ.मतीन यांने लग्नाचे आमिष दाखवून माज्या घरी नरसी येथे शारिरीक संबंध ठेवले व लग्णास नकार दिला अशी फिर्याद नायगाव पोलीसात दिल्याने आरोपी अ.मतीन अ.सलीम , अ.सलीम अ.करीमसाब , मौलनबी अ.सलीम, अ.नदीम अ.सलीम यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन मुख्य आरोपी मतीन यास अटक करूण न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी
सुनावली.
Read More कोव्हिड सर्व्हेक्षणात शिक्षकांनाच बनविले डॉक्टर