23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्राइममित्राचा खून करणा-यास आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

मित्राचा खून करणा-यास आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरातील एका जीममध्ये आपल्या मित्रांसोबत दारू ढोसून दुस-या मित्राचा खून करून त्यास संपविणा-या देगावचाळ येथील एका आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आर.धामेचा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड. यादव तळेगावकर यांनी मांडली.

देगावचाळ येथील पंकज देवानंद हटकर यांनी दि.९ जानेवारी २०१७ रोजी तक्रार दिली की, मी मिस्त्री काम करतो व ८ जानेवारी २०१७ रोजी दाभड येथे कामाला गेलो होतो. सायंकाळी येथून परत आलो तेंव्हा देगावचाळीतील बरेच मित्र एकत्रीत बोलत बसले होते.

त्यातील एकाने सांगितले की, माझा भाऊ पवन हटकर आणि सचिन लोणे यांच्यामध्ये वाद झाला आहे. पवनचा शोध घेत मी आणि माझे मित्र चिखलवाडी कॉर्नर येथील डॉ.अशोक विठ्ठलराव उत्तरवार यांच्या प्राणदा जिममध्ये गेलो. प्राणदा जिमला लॉक लागलेले होते. त्यानंतर आम्ही ही माहिती वजिराबाद पोलीसांनी सांगितली.

पोलीसांसह प्राणदा जिम उघडली तेंव्हा माझा भाऊ पवन देवानंद हाटकर हा रक्ताच्या थोरोळ्यात पडलेला होता. त्याचा गळा कापण्यात आला होता. तसेच छातीवर व पोटावर जखमा होत्या. ज्या खंजीरने त्याच्यावर हल्ला झाला तो खंजीर सुध्दा येथेच पडलेला होता. हल्ला झाला आणि लगेच तो मरण पावला होता. या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी कलम ३०२ प्रमाणे मारेकरी सचिन चंद्रमणी लोणे वय २२ रा.देगावचाळ याच्याविरुध्द दाखल केला. या खटल्यात एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबानुसार तो साक्षीदार सचिन लोणे आणि पवन हाटकर असे सर्व दि. ८ जानेवारी २०१७ रोजी दुपारपासूनच दारु पित होते.

हा सर्व दारु पिण्याचा कार्यक्रम प्राणदा जिममध्ये झाला. पवन हाटकरला दारु जास्त झाली, सचिन लोणेला मात्र दारु चढली नव्हती. त्या जीममध्ये झालेली घाण सर्व सचिन लोणे साफ केली आपल्या हातात ग्लोज घालून सचिन लोणेने पवन हटकरवर हल्ला केला. त्याला खाली पाडून त्याच्यावर तो बसला आणि त्याने खंजीरचे वार केले असा जबाब पोलीसांना दिला होता. या प्रकरणाचे तपासीक अंमलदार तत्कालीन सहायय्क पोलीस निरिक्षक आनंद झोटे यांनी सचिन चंद्रमणी लोणेला अटक करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक ३५/२०१७ या क्रमांकाने चालला. या खटल्यात एकूण ८ साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुराव्याच्या आधारावर न्या.ए.आर.धामेचा यांनी आपलाच मित्र पवन देवानंद हटकरचा खून करणा-्या सचिन चंद्रमणी लोणे वय २२ रा.देगावचाळ नांदेड यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याची माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. यादव तळेगावकर यांनी दिली.

आरोपी सचिन लोणे पाच हजार रुपये दंड सुध्दा ठोठवण्यात आला आहे. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा निकालात प्रस्तावित करण्यात आली आहे. या खटल्यात वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे यांनी पैरवी अधिका-याची भुमिका पुर्ण केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या