23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडआरोपी युवकाला ३ वर्षाची सक्तमजुरी

आरोपी युवकाला ३ वर्षाची सक्तमजुरी

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
शाळेशेजीरी असलेल्या खारीमध्ये नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका नऊ वर्षीय बालिकेवर अभद्र व्यवहार करणा-या २१ वर्षीय आरोपी युवकाला अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी ३ वर्ष सक्तमजुरी शिक्षा सुनावली आहे. सोबत दोन हजार रुपये रोख दंडही ठोठावला.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार दि. ३ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी १ वाजता शाळेचे मध्यांतर झाले. तेंव्हा ती ९ वर्षाची बालिका शाळेशेजारी असलेल्या एका शेताच्या खारीत आपल्या नैसर्गिक विधीसाठी गेली. त्यावेळी व्यंकटेश उर्फ पप्पु रामकिशन पुयड वय २१ याने त्या बालिकेला पकडून तिच्यासोबत अभद्र व्यवहार करतांना कपडे काढले. अचानक झालेल्या हल्याने ती बालिको ओरडली तेंव्हा आसपासची मंडळी पळत आली. तेंव्हा व्यंकटेश उर्फ पप्पु पुयडने त्यांना सुध्दा मारहाण केली. बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक १९५/२०१५ दाखल केला. आरोपी व्यंकटेश उर्फ पप्पु पुयडला अटक करुन तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक परशुराम मराडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात हा विशेष पोक्सो खटला ३१/२०१५ प्रमाणे सुरू झाला.

न्यायालयात ९ वषाच्या बालिकेसह एकूण ९ जणांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध झालेल्या पुराव्या आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणा-या व्यंकटेश उर्फ पप्पु रामकिशन पुयडला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (ब) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ७ प्रमाणे एकत्रित ३ वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी बाजु मांडली. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फयाज सिद्दीकी यांनी पैरवी अधिक-याची भुमिका वठवली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या