36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडकुंडलवाडीत विना मास्क फिरणा-या ३१ जणांवर कारवाई

कुंडलवाडीत विना मास्क फिरणा-या ३१ जणांवर कारवाई

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : कुंडलवाडी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्तरित्या ंआठवडी बाजार असल्याने शहरात मोहिम राबविण्यात आली.यात कोव्हीड नियमाचे पालन न करणा-या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३१ जणांना दंड लावून ६ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठवडी बाजाराचा दिवशी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.विनामास्क फिरणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहेत. तर शहरातील हॉटेल्स, उपहारगृह, किराणा दुकान, खाजगी संस्थांच्या मालकांना व व्यापारी प्रतिष्ठाने यांना नोटीस देऊन योग्य त्या उपाययोजनांची खबरदारी घेण्यासाठी कळविले आहे. नियमांचे उल्लंघन करणा‍-याविरुद्ध दि.५ रोजी आठवडी बाजारानिमित्त दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विना मास्क फिरणा-यांना दोनशे ते पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.

नांदेड सह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कुंडलवाडी नगरपरिषद प्रशासन करीत असून स्थानिक प्रशासनाने दि.५ मार्च रोजी आठवडी बाजार व शहरात विनामास्क फिरणारे नागरिक,वाहनचालक यांना थांबवून दंड आकारला गेला.पुन्हा १५ दिवसानंतर अचानक झालेल्या कारवाईने नागरिक चांगलेच भांबावून गेले.या कारवाईत मारोती करपे,मुंजाजी रेणगुडे, राम पिचकेवार, प्रकाश भोरे,मोहन कंपाळे,बालाजी टोपाजी,शंकर जायेवार,धोंडीबा वाघमारे, जनार्धन भोरे,राम वाघमारे, विजय वाघमारे,गंगाधर बसापुरे यांच्यासह पोहेकॉ.इद्रिस बेग आदीजण या विशेष मोहीमेत सहभागी झाले होते.

थोडक्यात बचावलो! लघुग्रह पृथ्वीच्या एकदम जवळून गेला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या