34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडसायखेड येथे अवैध देशी - विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई

सायखेड येथे अवैध देशी – विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई

एकमत ऑनलाईन

धमार्बाद (माधव हानमंते) : धमार्बाद तालुक्यातील सायखेड येथे संध्याकाळी येथील एका किराणा दुकान व हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारूचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांना मिळाली असता त्या ठिकाणी छापा मारून मुद्देमालासह आरोपींना अटक केल्यामुळे अवैध दारू विक्री करणा-्यांचे धाबे दणाणले आहेत.

धमार्बाद तालुक्यातील सायखेड येथे अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहका-्यांना मिळाली होती. सदरील माहितीवरून पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहका-्यांनी शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील सायखेड येथील एका किराणा दुकानात व हॉटेलमध्ये छापा टाकून ६ हजार ९२० रुपयांचे देशी व विदेशी दारू जप्त करून आरोपी श्रीनिवास लक्ष्मण येम्मेवार व नागोराव संतराम वडपत्रे यांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, हरीश मांजरमकर, पंडित कल्याणकर, संतोष आनेराये, संतोष भोसले यांनी केली.

जारीकोटमध्येही ठिकठिकाणी अवैध दारू विक्री जोमात
तालुक्यातील जारीकोट येथे ठिकठिकाणी काही दिवसांपासून देशी – विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. त्यामुळे गल्लोगल्ली तळीरामांचा वावर वाढला असून महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे. जारीकोट येथे वार्ड क्रमांक एक मधील बौद्ध वाडा व मातंग वाडा या परिसरात सात ते आठ लोकांच्या घरी खुलेआम देशी विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने कोणाच्या आशीवार्दाने सुरू आहेत. याचा शोध वरिष्ठ पोलीस अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-्यांनी घेणे गरजेचे आहे.

प्रशासकीय सूचना धाब्यावर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कोरोनातील नियम, सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु कायद्याचा धाक मोजक्याच नागरिकांना दाखविला जात आहे. नियम मोडण-्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अशांवर कारवाई होण्याची गरज आहे.

‘दक्षिणे दिग्वीजयाचे’ दिवास्वप्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या