नांदेड : गोदावरी नदीच्या काठी अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी रात्री स्वत:ऑन दि स्पॉट दाखल होऊन वाळू माफियांवर धाडसी कारवाई करित वीस वाहने जप्त केली. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी, मन्याड, आसना या प्रमुख नद्यांमधील माफियांकडून अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहेक़ाही दिवसापुर्वी वाळू माफियांनी बिहार राज्यातून मजूर मागवून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू केला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाया केल्या होत्या.शेकडो तराफे जप्त करून ते जाळण्यात आले.
तसेच अनेक वाहने,बोटी,साहित्य आणि वाळू जप्त करण्यासोबतच वाळू माफियांवर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात वाळू उपसा कमी झाला होता. सध्या जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट असून त्यापैकी देगलूर, बिलोली आणि माहूर तालुक्यातील एकूण ३२ वाळू घाटांच्या ई – लिलावाची प्रक्रिया नवीन वर्षात सुरू करण्यात आली आहे. वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून काही वाळू माफियांनी नांदेड तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी अवैध आणि विनापरवाना वाळू उपसा सुरू केला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता महसूल अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिस व आरटीओ विभागाला बोलावून अचानक ऑन दि स्पॉट दाखल होऊन धडक कारवाई केली.
यात नांदेड शहरालगत गोदावरी नदी काठावर असलेल्या थुगाव, बोंढार, पिंपळगाव कोरका या गावांना भेटी देऊन अवैध वाळू उपसा करणा-यांवर पथकाने कारवाई केली. या कारवाईत १५ टिप्पर, तीन जेसीबी आणि दोन पोकलेन जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. बुधवारी रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. मकरसंक्रातीच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी नांदेड शहर अनिरुद्ध जोंधळे , अनिल धुलगुडेकोंडीबा नागरवाड तलाठी नारायण गाडे, उमाकांत भांगे, सचिन नरवाडे ,सय्यद मोहसीन , आकाश कांबळे, संताजी देवापुरकर, ईश्वर मंडगिलवार चालक जहिरोद्दीन ,गजानन काळे रवी भोकरे यांनी अथक परिश्रम घेतले.या सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया चालू असून व वाळू तसेच माती माफियांवर या पुढेही सुरूच राहिल असे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगीतले.
नांदेडला कोरोना प्रतिबंधक लसीचे १७३३० डोस मिळाले