31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडकोरोना तपासणी वरुन तीन मेडिकल चालकाविरुद्ध कारवाई

कोरोना तपासणी वरुन तीन मेडिकल चालकाविरुद्ध कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना विषाणुला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपिन यांनी दिलेल्या आदेशानुसार विकेन्ड लॉकडाऊन लावण्यात आला आहे व्यवसायिकांनी कोरोनाची तपासणी करणे बंधनकारक असताना काही जण तसाच व्यवसाय करीत आहेत ही बाब आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या लक्षात आल्यानंतर रविवार सकाळ त्यांनी आपल्या सहक-यांना सोबत घेऊन काही दुकानदारांची तपासणी केली त्यात तिन मेडिकल चालकाविरुद्ध कारवाई करून ४४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे मुर्ती लहान किर्ती महान आयुक्त डॉ सुनिल लहाने अशी असे बोलल्या जात आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत विकेन्ड लॉकडाऊन लावण्यात आला आहे असे असताना स्थानिक पातळीवर नागरीक गांभियार्ने लक्ष घेत नाहीत सर्वांनी मेमाचे पालन केले तर कोरोनाविषाणुला रोखण्यासाठी मदत होईल विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने सर्वथा महापालीकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने हे रस्त्यावर उतरले आहेत कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत रविवार सकाळ त्यांनी आपल्या सहका-ाांना सोबत घेऊन मेडिकल चालकांची संपूर्ण तपासणी केली या दरम्यान शहरातील भारत मेडिकल, भासीन मेडिकल, संजय मेडिकल या दुकानातील चालकाने कोरोना तपासणी केली नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे त्यांना प्रत्येकी १४ ते १६ हजार रुपये पर्यंत दंड लावण्यात आला आहे .

नागरीकानी कोरोना विषाणुला रोखण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागावे नियमांचे पालन करुन नियमित माक्स सानिटाझर चा वापर करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शहरातील प्रत्येक दुकानदारांनी कोरोना तपासणी करने बंधनकारक आहे या पुढे नियमांचे पालन केले नाही तर दंड लावुन कारवाई करण्यात येईल असे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी सांगितले या कारवाईत कर व मुल्यमापन विभागाचे उपायुक्त संधू यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

बोरी बसस्थानकासमोरील पाच दुकाने जळून खाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या