21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडविनातिकीट प्रवाशांवर रेल्वे विभागाची कारवाई

विनातिकीट प्रवाशांवर रेल्वे विभागाची कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड : दक्षिण मध्य रल्वेच्या नांदेड विभागाकडून विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती. ज्यात १२८५ विना तिकीट रेल्वेने प्रवास करणा-या फुकट्या प्रवांशाकडून ६ लाख १० हजार रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे.

नांदेड विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील यांनी दिनांक १० जुलै ते १५ जुलै दरम्यान नांदेड रेल्वे विभागात धडक तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या सोबत इतर तिकीट तपासनीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे अधिकारी आणि जवान हि शामिल होते. या तिकीट तपासणी मोहिमेत नांदेड ते मुदखेड, नांदेड ते आदिलाद, नांदेड ते मनमाड, नांदेड ते अकोला अश्या विविध भागात धावणा-या रेल्वे गाड्यामध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल १२८५ विनातिकीट प्रवाशी सापडले.

तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त समान घेवून जाण्यामुळे काही प्रवाश्यांवर कार्यवाही करण्यात आली. या अनियमित, विनातिकीट प्रवाशांकडून ६ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हि तिकीट तपासणी मोहीम विनातिकीट प्रवास करणा-या अनधिकृत प्रवाश्यांमध्ये नैतिक भीती निर्माण करण्याकरिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आली. प्रवाशांनी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा आणि होणा‍-या कार्यवाहीला टाळावे. रेल्वे प्रवासात कोविड-१९ च्या राज्य शासन आणि केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांचे, नियमांचे पूर्ण पालन करावे. असे आवाहन रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील यांनी जनतेस केले आहे.

जि.प. प्राथमिक शाळा नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या