देगलूर : प्रतिनिधी
मुखेड चे प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंगळवार दुपारी बोगस रॉयल्टी व ओव्हरलोड वाळू वाहने ताब्यात घेऊन देगलूर तहसील कार्यालय यांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर तात्काळ देगलूरात नव्याने रुजू झालेले सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी आपल्या फौजफाट्यासह शेळगाव वाळू घाट येथे भेट देऊन सखोल चौकशी केल्याने वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे हे दोन सनदी अधिकारी रुजू होण्यापूर्वी देगलूर व बिलोली वाळू घाटातून ठेकेदारांनी हैदोस घातला होता. सौ. शर्मा आता अक्शन मोडवर आले असून वाळू तस्करावर किंवा त्यांना पाठराखण करणा-्या यंत्रणेवर काय कारवाई करतील याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
रेती ठेकेदारांच्या मनमानीला वेसन घालण्याची प्रक्रीया सुरू झाली असून देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा आज अचानक अॅक्शन मोड वर आल्याचे दिसून येत असून बोगस रॉयल्टी व ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणारे आठ वाहन जप्त करण्यात आले असून संबंधीत गाड्यांचे पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. मुखेडचे प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी ही वाहने लावली असे सांगण्यात येते.
नांदेड जिल्ह्यातील मुख्यत्वे बिलोली आणि देगलूर भागात सर्वाधिक रेतीचे घाट आहेत. यापैकी कांही घाटांची लिलाव प्रक्रीया गौणखनिज विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. संबंधीत ठेकेदाराला उत्खणनानाचा अंतिम आदेश देताना पर्यावरण तसेच सर्वोच्च न्यायालय, खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे बंधन जिल्हाधिकारी यांनी टाकले होते.
मांजरा नदी पात्रातील लाल रेतीला तेलंगणा, कर्नाटक तसेच अन्य भागात मोठी मागणी असल्याने संबंधीत ठेकेदार महसूल यंत्रणेच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र समोर आले आहे आयएएस श्रेणीतील सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची सरकारने येथे नियुक्ती केली. त्या देगलूर येथेरुजू होताच कार्यक्षेत्रातील विभाग प्रमुखाची बैठक घेवून अधिक प्रभावी काम करण्याच्या सुचना शर्मा यांनी दिल्या होत्या. रुजू झाल्यापासून अवैध रेती उत्खणन व वाहतूक हा विषय एैरणीवर आला होता. आज या विषयाला सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी हात घालून बोगस रॉयल्टी तसेच नियमांचा भंग करून ओव्हरलोड वाहतूक करणारे आठ वाहने जप्त केली आहेत.
सर्व वाहने बोळेगाव रेती घाटाचे असून अन्य घाटांवर नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास भविष्यात हे घाट सिल केल्यास नवल वाटू नये. घाट सुरू झाल्यापासून संबंधीत ठेकेदार उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार कदम, तसेच नायब तहसिलदार वसंत नरवाडे यांना अवैध उत्खणन करण्यासाठी मूक संमती दिली असल्याचा आरोप ठेकेदाराने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे मांडला असल्याचा सांगण्यात येत आहे.