25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडचक्क एपीआयने बरमुड्यावर घेतली बैठक

चक्क एपीआयने बरमुड्यावर घेतली बैठक

एकमत ऑनलाईन

नांदेड : पोलिस विभाग म्हटले की, नियम, शिस्त आणि कायदा आलाच. परंतू या सर्व नियमांची पायमल्ली करून जिल्हयात महामार्ग विभागातंर्गत चौकीवर कार्यरत एका एपीआयने चक्क बरमुडा व टी शर्ट, अशा अवस्थेत आपल्या अधिनस्त पोलिस कर्मचा-यांची बैठक घेतल्याची जोरदार चर्चा होत आहे. वरिष्ठ अधिका-यास असे वर्तन करता येते का? अशा अवस्थेत बैठक घेता येते का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महामार्ग पोलिस चौकी कार्यरत असून या चौकीवर पोलिस निरीक्षक अथवा सहायक पोलिस निरीक्षक यांच्या अधिपथ्याखाली गरजेप्रमाणे पोलिस कर्मचा-यांची नियुक्ती केली जाते. आजघडीला नांदेड जिल्हयातील अशा महामार्गावर काही ठिकाणी सहायक तथा प्रभारी पोलिस निरीक्षकांची नेमणुक आहे. अपवाद वगळता अशा अधिकारी, कर्मचा-यांची कामगिरी नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यापुर्वी वसमत फाटा येथील महामार्ग पोलिस चौकीची कामगिरी चर्चेत आली होती. यानंतर आता शेजारीच असलेल्या एका पोलिस चौकीच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षकांची कामगिरी बरमोड्यामुळे चर्चेत आली आहे.

येथील प्रभारी अधिका-याने चक्क बरमोडा व टी शर्ट अशा अवस्थेत एका बाजेवर झोपून आपल्या अधिनस्त पोलिस अंमलदारांची हितगुज बैठक घेतली. यावेळी त्यांचा तोल ही सुटला होता, अशी जोरदार चर्चा होत आहे. पोलिस चौकी म्हणजे एखादे निवासस्थान अथवा फार्महाऊस असल्या गत ही बैठक घेण्यात आली. काही वेळ तोल सोडून बोलणे, मनमानी कारभार यामुळे अधिनस्त कर्मचारी हैराण झाले आहेत. एखाद्या शासकीय कार्यालयात तेथील प्रभारी अधिकारीच जर अशा अर्धनग्न (बरमुडा व टी शर्टवर) अवस्थेत वावरत असतील तर तेथील बाकीच्या कर्मचा-यांनी काय आदर्श घ्यावा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

सदरचे महामार्ग सुरक्षा केंद्र हे मुख्य रोड असल्याने येथुन ये-जा करीत असलेल्या येथील कर्मचा-यांसह नागरिक व परिसरातील शेतकरी, शेतमजूरांना हा प्रकार निमुटपणे सहन करावा लागत आहे. अशा शासकीय कार्यालयात असे प्रभारी अधिका-यास वावरता येते का? किंवा अधिनस्त अंमलदारांची अशा अवस्थेत बैठक घेता येते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या कामगिरीची महामार्ग विभागाच्या नागपूर मख्यालयातील वरिष्ठ अधिका-यासह महामार्ग पोलिस प्रादेशिक विभाग औरंगाबाद येथील अधिकारी काही दखल घेतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या