29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार २८७ नव्या कोराना रूग्णांची भर

नांदेड जिल्ह्यात १ हजार २८७ नव्या कोराना रूग्णांची भर

एकमत ऑनलाईन

नांदेड: जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ५ हजार ६६५ अहवालापैकी १ हजार २८७ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७२९ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५५८ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६७ हजार ८८७ एवढी झाली असून यातील ५२ हजार ५४१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत असून १९७ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक १६ ते १८ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २५७ एवढी झाली आहे. आज रोजी १९७ रूग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.३९ टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २०३, नांदेड ग्रामीण २६, अर्धापुर ३, बिलोली ७४, देगलूर ५२५, धर्माबाद ३२, हदगाव ५४, हिमायतनगर २४, कंधार ८८, किनवट ५, लोहा ६, मुखेड १०, मुदखेड ५, नायगाव ९६, उमरी ४१, परभणी १, हिंगोली ६, यवतमाळ १, भोकर २, अर्धापुर ३ असे एकूण ७२९ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात १७७, नांदेड ग्रामीण १२, अर्धापुर २३, भोकर १२, बिलोली ३२, देगलूर २२, धर्माबाद १०, हदगाव १५, हिमायतनगर ३, कंधार ९, किनवट ६३, लोहा १३, माहूर १०,मुदाखेड १६, मुखेड ७५, नायगाव ९, उमरी ४९, परभणी २, लातूर १, यवतमाळ १, हिंगोली ३, बुलढाणा १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ५५८ बाधित आढळले.

आज १ हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ६०६, माहूर तालुक्याअंतर्गत १५, किनवट कोविड रुग्णालय २९, नायगाव तालुक्यातंर्गत १०, खाजगी रुग्णालय १२३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३८, मुखेड कोविड रुग्णालय १७२, कंधार तालुक्याअंतर्गत ३, बारड कोविड केअर सेंटर ९, अर्धापुर तालुक्यातंर्गत २३,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २२, हदगाव कोविड रुग्णालय २३, उमरी तालुक्यातंर्गत ९, लोहा तालुक्यातंर्गत ४०, मांडवी कोविड केअर सेंटर १४ यांचा समावेश आहे. जिल्ह्यात १३ हजार ८२८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २००, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२१, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १५३, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२३, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २४२, देगलूर कोविड रुग्णालय ५२, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ८८, बिलोली कोविड केअर सेंटर २१८, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १९, उमरी कोविड केअर सेंटर ६२, माहूर कोविड केअर सेंटर ६६, भोकर कोविड केअर सेंटर ३१, हदगाव कोविड रुग्णालय ४४, हदगाव कोविड केअर सेंटर ३५, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३५, कंधार कोविड केअर सेंटर ३२, धर्माबाद कोविड केअर सेंटर १३३, मुदखेड कोविड केअर सेंटर १५३, बारड कोविड केअर सेंटर १५, मांडवी कोविड केअर सेंटर ८, अर्धापुर कोविड केअर सेंटर २४, एनआरआय कोविड केअर सेंटर ९९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १७५, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ४९३ , नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण ४ हजार ७३, खाजगी रुग्णालय १ हजार ७५३, हैद्राबाद येथे संदर्भित १ असे एकूण १३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत. आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे १७ खाटा उपलब्ध आहेत.

मोहोळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या