30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार २८८ कोरोना रूग्णांची भर

नांदेड जिल्ह्यात १ हजार २८८ कोरोना रूग्णांची भर

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४ हजार ३५६ अहवालापैकी १ हजार २८८ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६७५ तर अँटिजेन तपासणीद्वारे ६१३ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६३ हजार ७९९ एवढी झाली असून यातील ४७ हजार ७९९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ५१७ रुग्ण उपचार घेत असून २२६ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. दिनांक १३ ते १५ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार १७७ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.५६ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २६७, नांदेड ग्रामीण २७, अधार्पूर ६१, बिलोली २, देगलूर 34, धर्माबाद १, हदगाव ६१, हिमायतनगर २८, कंधार ३२, किनवट ५, लोहा ३६, माहूर ७, मुखेड ५९, मुदखेड ४, नायगाव ३१, उमरी ४, परभणी ५, हिंगोली ८, लातूर २, यवतमाळ ३ असे एकूण ६७५ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात २६९, नांदेड ग्रामीण १६, अर्धापुर १४, भोकर १२, बिलोली ९, देगलूर १०, धमार्बाद १, हदगाव ३, कंधार ८, किनवट ७०, लोहा ४३, माहूर १७, मुखेड ८४, नायगाव ४८, उमरी १, परभणी २, यवतमाळ २, भैसा १, हिंगोली ३ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ६१३ बाधित आढळले.

आज १ हजार ४७ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १५, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ५२८, कंधार तालुक्याअंतर्गत ३, किनवट कोविड रुग्णालय १००, हिमायतनगर तालुक्यातंर्गत ९, माहूर तालुक्यातंर्गत २, देगलूर कोविड रुग्णालय १५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३४, मुखेड कोविड रुग्णालय ७७, नायगाव तालुक्यातंर्गत १४, बारड कोविड केअर सेंटर १, अधार्पूर तालुक्यातंर्गत २४, बिलोली तालुक्यातंर्ग ३७, खाजगी रुग्णालय १०२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ८, हदगाव कोविड रुग्णालय २०, धमार्बाद तालुक्यातंर्गत ९, उमरी तालुक्यातंर्गत १२, लोहा तालुक्यातंर्गत ३५, भोकर तालुक्यातंर्गत २ यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १३ हजार ५१७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २२८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १६९, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३७, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २०४, देगलूर कोविड रुग्णालय १६०, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ९२, बिलोली कोविड केअर सेंटर १४३, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २४, उमरी कोविड केअर सेंटर ४९, माहूर कोविड केअर सेंटर ६४, भोकर कोविड केअर सेंटर २५, हदगाव कोविड रुग्णालय ४७, हदगाव कोविड केअर सेंटर १०५, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३१, कंधार कोविड केअर सेंटर २७, धमार्बाद कोविड केअर सेंटर १४०, मुदखेड कोविड केअर सेंटर १८, बारड कोविड केअर सेंटर ३०, मांडवी कोविड केअर सेंटर १३, महसूल कोविड केअर सेंटर ७५, एनआरआय कोविड केअर सेंटर ११४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १५१, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ५६३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण ३ हजार ८६४, खाजगी रुग्णालय १ हजार ६०७ असे एकूण १३ हजार ५१७ रुग्ण उपचार घेत आहेत. आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ८, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे १२ खाटा उपलब्ध आहेत.

 

संचारबंदीला न जुमानता नागरीक रस्त्यावर; बेशिस्त वागणुकीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या