नांदेड : कोरोनाबाधितांनी पुन्हा एकदा एकाच दिवसात शंभरी पार करित उच्चांक केला आहे.जिल्ह्यात सायं. ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ५६ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर ११७ नव्या रूग्णांची भर पडली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसापासून कोरोनाचे तांडवच सुरू आहे. यामुळे नांदेड जिल्यात कोरोनाबाधित रूग्णांची झपाटयाने वाढ होत आहेग़ुरूवारी पुन्हा कोरोनाबाधितांनी पुन्हा एकदा एकाच दिवसात शंभरी पार करित उच्चांक केला आहे.
जिल्ह्यात सायं. ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ११७ नव्या रूग्णांची भर पडली आहे. आजच्या एकूण ६५६ अहवालापैकी ४५७ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ६८५ एवढी झाली असून यातील ८४६ एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण ७४९ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ५ महिला व ५ पुरुषांचा समावेश आहे. बुधवार २९ जुलै रोजी कंधार येथील ६५ वर्षाची एक महिला, देगलूर येथील ६८ वषार्चा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे आणि वजिराबाद नांदेड येथील ४० वर्षाचा एक पुरुषाचा व गुरुवार ३० जुलै रोजी नेरली नांदेड येथील ५० वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ७४ एवढी झाली आहे.
आज बरे झालेल्या ५६ बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील १९, देगलूर कोविड केअर सेंटर येथील १३, उमरी कोविड केअर सेंटर येथील १०, खाजगी रुग्णालयातील ६, मुखेड कोविड केअर सेंटर येथील ७, बिलोली कोविड केअर सेंटर येथील १ अशा ५६ कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये कलामंदिर येथील ४४ वर्षाचा १ पुरुष, वाडी येथील ६५ वर्षार्ची १ स्त्री, गितानगर येथील ७६ वर्षाचा १ पुरुष, बालाजीनगर येथील २२ वर्षाचा एक पुरुष, सोमेश कॉलनी येथील २१ वर्षार्ची एक स्त्री, शास्त्रीनगर येथील ५५ वर्षार्ची १ स्त्री, चौफाळा रोड येथील ४0 वर्षाचा एक पुरुष, गाडीपुरा येथील ४0 वषार्चा एक पुरुष, वसंतनगर येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, गोवर्धन घाट येथील १४ वर्षाचा एक मुलगा, गणेशनगर येथील ३६ वर्षार्ची १ स्त्री, आनंदनगर येथील ३५ वर्षाचा एक पुरुष व ६५ वर्षार्ची १ स्त्री, मदिनानगर येथील ५८ वषार्चा एक पुरुष, हडको येथील २९ वर्षाचा एक पुरुष, सिडको येथील ५२ वषार्ची १ स्त्री, वसरणी येथील १७ वषार्चा एक पुरुष तर ३५, ७0 वर्षाच्या दोन स्त्री, वाजेगाव येथील २३ वर्षार्चा एक पुरुष असे नांदेड शहरातील बाधित आहेत.
अधार्पूर येथील १२ वषार्चा एक मुलगा, सगरोळी येथील १८ वषार्चा एक पुरुष व ५५ वर्षार्ची एक स्त्री, कोलेबोर येथील ४0 वषार्चा एक पुरुष, देगलूर येथील ६८ वषार्चा एक पुरुष, करेमलकापूर देगलूर येथील ४९ वषार्चा एक पुरुष, देगलूर येथील ५0 वषार्चा एक पुरुष, भोईगल्ली येथील अनुक्रमे १४.२८ व ३१ वषार्चे तीन पुरुष व ४५ वषार्ची एक स्त्री, लाईनगल्ली येथील 18,48 वषार्चे २ पुरुष व २५,२६,६0 वर्षाच्या 3 महिला, नागोबा मंदिर येथील ६८ वर्षाची १ स्त्री, ५0,७२ वर्षाच्या २ स्त्री, भाविदास चौक येथील ४३ वर्षाचा एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील ५२ वर्षाचा एक पुरुष, धमार्बाद येथील २८ वर्षाचा एक पुरुष, हदगाव येथील अनुक्रमे १५,१५,१७,२८,२४,३0,३0,४७,५0 वर्षार्चे ९ पुरुष व २९, ३४, ४५,५0 वर्षाच्या ४ महिला, तामसा येथील २९ वर्षार्चा १ पुरुष व ३0 वर्षार्ची १ महिला, कंधार येथील ७0 वर्षाचा १ पुरुष, हात्तेपुरा येथील १९ व ७५ वर्षार्चे २ पुरुष, फुलवळ येथील २0,२९ वषार्चे २ पुरुष व ४८ वषार्ची १ स्त्री, फुलेनगर येथील ३४ वषार्ची १ स्त्री, पानभोसी येथील ६५ वषार्चा १ पुरुष, सोनखेड येथील ५७ वषार्चा १ पुरुष, मंग्याल ता. मुखेड येथील ३२ वषार्चा १ पुरुष, मुखेड येथील ३२ वषार्चा १ पुरुष, वाल्मीक नगर येथील ३८ वर्षाचा एक पुरुष, नायगाव येथील ४0, ४९ वषार्चे २ पुरुष, नरसी येथील ५0 वर्षार्ची १ स्त्री, कोकलेगाव येथील ३२ वर्षाचा १ पुरुष, उमरी येथील ६७ वषार्चा १ पुरुष, खुसदा पुर्णा येथील ४९ वषार्चा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
अँटिजेन तपासणीद्वारे हैदरबाग येथील ६0 वर्षाचा एक पुरुष, गोवर्धन घाट येथील ४0 वर्षाचा एक पुरुष, बोरबन येथील १४,३९,४0 वर्षार्चे ३ पुरुष तर १३ व ३७ वर्षाच्या २ स्त्री, कोसरनगर येथील २0 वर्षार्ची १ स्त्री, कौठा येथील ३४ वषार्चा १ पुरुष, जयभीमनगर येथील १३,२२,२५,२९,३0,४0,४५ वर्षार्चे ७ पुरुष व ६,१६,१९,३४,३५,४0,६0 वर्षाच्या ८ महिला, मुखेड येथील १८ वषार्चा एक पुरुष तर ४,२५,२९,३६ वय वर्षाच्या ४ महिला, नागसेननगर नांदेड येथील १२,१३,१४ वर्षार्चे 3 पुरुष, राजनगर नांदेड येथील ३२ वर्षार्चा १ पुरुष, चिखलवाडी येथील ३0 वषार्चा १ पुरुष व १0,३४ वर्षाच्या २ स्त्री, जेतवननगर येथील ४७ वर्षाचा एक पुरुष, महाविर सोसायटी येथील ७२ वषार्चा एक पुरुष, हडको येथील ५0 वषार्चा एक पुरुष, देगलूर येथील ६२ वर्षार्ची १ स्त्री, दापका येथील ८ वर्षाचा एक पुरुष, भोकर येथील ५१ वर्षार्ची १ स्त्री हे बाधित आढळले.
जिल्ह्यात ७४९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३0, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २६९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २५, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १९, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १५, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ९५, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 39, लोहा कोविड केअर सेंटर येथे २, हदगाव कोविड केअर सेंटर २७, भोकर कोविड केअर सेंटर ३, कंधार कोविड केअर सेंटर येथे १३, धमार्बाद कोविड केअर सेंटर येथे २४, किनवट कोविड केअर सेंटर येथे १0, खाजगी रुग्णालयात ७२ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ३ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित तर मुंबई येथे २ बाधित संदर्भित झाले आहेत.
Read More भावांपर्यंत राख्या पोहचण्यासाठी बहिणींच्या मदतीला पोस्ट कार्यालय सज्ज