25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ४ हजार ७३३ अहवालापैकी १ हजार ३७५ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ९६९ तर अँटिजेन तपासणीद्वारे ४०६ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६९ हजार २६२ एवढी झाली असून यातील ५३ हजार ७४६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ९८३ रुग्ण उपचार घेत असून १९३ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २७२ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.५९ टक्के आहे. आज रोजी अतिगंभीर असलेले रूग्णांची संख्या १९३.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३६७, नांदेड ग्रामीण ३५, अर्धापुर ६२, भोकर ७४, बिलोली ४३, देगलूर ५८, धर्माबाद ४४, हिमायतनगर १२, कंधार २, किनवट ९, लोहा ५८, मुखेड ६५, मुदखेड ९, नायगाव ९०, उमरी २८, हदगाव ५, परभणी २, हिंगोली ३, यवतमाळ १,लातूर १, सातारा १, असे एकूण ९६९ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ८६, नांदेड ग्रामीण ३, अर्धापुर ४, भोकर १, बिलोली ४, देगलूर ३, धर्माबाद ३५, हदगाव १७, हिमायतनगर १०, कंधार १२, किनवट १४, लोहा २, माहूर १६, मुदखेड ४, मुखेड १३३, नायगाव ४३, उमरी ९, परभणी १, लातूर १, यवतमाळ १, हिंगोली ६, निजामाबाद १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ४०६ बाधित आढळले.

आज १ हजार २०५ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १७, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७०४, मुदखेड तालुक्यातर्गत ४, देगलूर कोविड रुगणालय ४, बिलोली तालुक्याअंतर्गत ५०, नायगाव तालुक्यातंर्गत २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३४, मुखेड कोविड रुगणालय ७२, कंधार तालुक्याअंतर्गत ४, माहूर तालुक्यातंर्गत २२, अर्धापुर तालुक्यातंर्गत २, बारड कोविड केअर केअर सेटर ९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १५, हदगाव कोविड रुग्णालय ५९, उमरी तालुक्यातंर्गत ४१, धमार्बाद कोविड केअर सेटर १५, खाजगी रुग्णालय ९५ यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १३ हजार ९८३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २१८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २०५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ११४, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २३५, देगलूर कोविड रुग्णालय ५४, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ६७, बिलोली कोविड केअर सेंटर २४८, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १३, नायगाव कोविड केअर सेंटर ५९, उमरी कोविड केअर सेंटर ६४, माहूर कोविड केअर सेंटर ५५, भोकर कोविड केअर सेंटर ३१, हदगाव कोविड रुग्णालय ४१, हदगाव कोविड केअर सेंटर ३२, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२०, कंधार कोविड केअर सेंटर २६, धर्माबाद कोविड केअर सेंटर १३५, मुदखेड कोविड केअर सेंटर १५३, अर्धापुर कोविड केअर सेटर ३२, बारड कोविड केअर सेंटर १९, मांडवी कोविड केअर सेंटर ८, एनआरआय कोविड केअर सेंटर ८७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १७५, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ५७५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण ४ हजार ६२, खाजगी रुग्णालय १ हजार ८९२, हैद्राबाद येथे संदर्भित १ असे एकूण १३ हजार ९८३ रुग्ण उपचार घेत आहेत

आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे १४ खाटा उपलब्ध आहेत.

लातुरातील नेत्र व दंत चिकित्सालये ३० एप्रिल पर्यंत बंद, मनपा आयुक्तांचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या