24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांचे महसूलमध्ये समायोजनाचे आदेश

पुरवठा विभागाच्या कर्मचा-यांचे महसूलमध्ये समायोजनाचे आदेश

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील अधीनस्त कार्यालयातील पदांचा सुधारीत आकृतीबंध मंजुर करण्यात आला असून, पदसंख्याही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कर्मचा-यांचा महसूल विभागात समायोजन करण्याचे आदेश प्राप्त झाले असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत. मात्र पुरवठा विभागाच्या कर्मचा-यांनी मूळ पदावर कायम ठेवण्याची मागणी करत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिरीक्त ठरविण्यात आलेल्या कर्मचा-यांनी शुक्रवारी आंदोलन केले.

पुरवठा विभागातील अधिका-यांचे सध्याचे पद निरस्त झाल्यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना सुधारीत आकृतीबंधानुसार नवनिर्मित पदावर समायोजनाने पदस्थापना देण्यात येणार आहे तर पुरवठा विभागातील काही कर्मचा-यांना आहे त्याच विभागात त्या पदावर कायम ठेवण्यात येणार आहे. काही संवर्गातील कर्मचा-यांचे पद निरस्त झाल्यामुळे त्यांना त्याच पदनामाने समायोजीत करणे शक्य नसल्याने अशा कर्मचा-यांना कार्यरत असलेल्या कार्यालयातच नवीन पदावर समायोजीत करण्यात येणार आहे. तर सुधारीत आकृतीबंधानुसार जिल्ह्यातील पुरवठा विभागातील कार्यरत शिपाई संवर्गातील पद मृत संवर्ग घोषित केल्याने त्यांना महसूल विभागाकडे प्रत्यार्पीत करण्यात येणार आहे.

मात्र जिल्ह्यातील पुरवठा विभागातील कर्मचारी व संघटनांचा या समायोजनाला विरोध करीत आहेत. पुरवठा विभाग आणि महसूल विभागात असलेल्या वेतनात तफावत आहे. तसेच यासह अन्य कारणामुळे पुरवठा कर्मचारी या समायोजनाला कडाडून विरोध करीत असून, या निर्णयाचा निषेध करत कर्मचा-यांनी शुक्रवार दि.२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम आंदोलन केले. सदर कर्मचा-यांनी आपल्याला कार्यरत ठिकाणी मूळ आस्थापनेवर पदस्थापना देवून कायम ठेवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या आदेशानुसार जिल्ह्यातील पुरवठा विभागातील कर्मचा-यांचे महसूल विभागात समायोजन करण्यात येणार आहे. दरम्यान कर्मचा-यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले असून, आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या