23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर

ब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

कंधार : राज्यात एक जून पर्यंत निर्बंध असतानाही काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असून, यासोबत काही व्यापाऱ्यांनीदेखील नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून ये आहे. त्यामुळे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विजय चव्हाण, आणि पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल केला.

शहरामधील सर्व व्यापारी व छोटे छोटे व्यावसायिक दुकानदार यांनी वेळेत दुकाने बंद करावी तसेच नियमांचे उल्लंघन करू नये, अशा सूचना नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. शनिवारी तहसीलदार व्यंकटेश मुंडे व नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी विजय चव्हाण आणि पोलीस प्रशासन शहरातील सार्वजनिक ठिकाणी वावरताना विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून व्यापारी व दुकानदार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले. यावेळी स्वच्छता निरीक्षक, इस्माईल शेख आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रशासनाच्या नियमांचे पालन करा
सर्दी, खोकला, ताप आल्यास अंगावर दुखणे न काढता तातडीने उपचार घ्या. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने सर्व खबरदारी घ्यावी. सर्दी खोकला ताप आल्यास घरीच अंगावर दुखणे न काढता तत्काळ उपचार घ्यावा. विनामास्क फिरु नये. प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.
– मुख्याधिकारी विजय चव्हाण

विनामास्क दिसाल तर दंडात्मक कारवाई
कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, कोरोना नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास विनामास्क व विनाकारण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासन ठिकठिकाणी लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.
– संग्राम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक

सीमावर्ती भागात दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या