37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडतब्बल ४४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गायरान पट्ट्याचे सातबारात रूपांतर

तब्बल ४४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गायरान पट्ट्याचे सातबारात रूपांतर

एकमत ऑनलाईन

किनवट : स्व.इंदिरा गांधी यांच्या काळातील गायरान जमिनीचा प्रश्न आ.भिमराव केरामांच्या पाठपुराव्याने मार्गी लागणार असून तब्बल ४४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गायरान पट्ट्याचे सात बारात रूपांतर होणार आहे.याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांना पत्र पाठविले आहे. तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंदाजे सन १९७६ साली कमाल जमीन धारणा कायदा व कसेल त्याची जमीन कायदा करून महसूल,गायरान,परमपोक आदी शीर्षकाखालील जमीन कसत असणा-या शेतक-यांच्या नावाने मालकी फेरफार करण्यात यावा असा महत्वपूर्ण निर्णय घेवून कायदा तयार केला.त्यानुसार किनवट विधानसभा मतदारसंघातील या कायद्याखाली जमीनी नावाने मालकी काही अंशी घेण्यात आली.यात सत्तर टक्के कार्यवाही महसूल प्रशासनाच्या दिरांगाई आणि उदासीन कारभारामुळे आजही अनेक शेतकरी जमीन ताब्यात असताना ही सात बारा पत्रकापासून वंचित आहेत.

तत्कालीन शासनाच्या जमीन धोरणामुळे किनवट आणि माहूर तालुक्यात अनेक असंख्य भूमिहीन शेतक-यांना गायरान व परंपोक या शीर्षकखालील जमीन पट्टे वाटप करण्यात आले होते.त्यानंतर शासनाचे विविध कायदे आले परंतु या कायद्यातील तरतुदी च्या अनुषंगाने महसूल विभागाने सदर पट्टे नियमानुकूल करून फेरफार काही उतरविले नाही त्यामुळे तत्कालीन मूळ शेतकारी कास्तकार मृत पावले आहेत.त्यांचे वारस महसूल प्रशासनकडे हेलपटे घालत आहेत.अशा एकूणच बंजारा,आदिवासी व इतर समाजाच्या कास्तकार शेतक-यांच्या नावाने तातडीने फेरफार व्हावा जमीन कसना-याच्या नावाने मालकी नोंद घेवून त्यांना कायद्याच संरक्षण प्राप्त व्हवा या उदांत हेतूने व शेतकरी हिताची जोपासना करत सर्वसमावेशक जनहिताची मागणी व त्याचा पाठपुरावा आ.भीमराव केराम यांनी करत दिनांक ३० जानेवारी रोजी विभागीय महसूल आयुक्त औरंगाबाद यांना येथील गायरान पट्टे धारक शेतक-यांची व्यथा सविस्तर स्वरूपात निवेदनाद्वारे मांडली होती. या निवेदनाची दखल घेत विभागीय महसूल आयुक्तांनी नुकतेच एक पत्र जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवून गायरान पट्टे धारक शेतक-यांची नावे सातबारा नोंद होणे कामी कारवाई करण्याचे आदेश केले आहे.

एकंदरीत आमदार भीमराव केराम यांच्या मागणीमुळे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील पासून लाल फितीत अडकलेल्या प्रकरणाला मूर्त रूप येणार असल्याने वषार्नुवर्ष पासून तहसील कचे-याचे उंबरठे झिजविणा-या शेतक-यांना न्याय मिळणार आहे.आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे गायरान जमीन नावावर होऊन त्याअनुषंगाने शासनाचे विविध योजनांचे लाभ,नुकसान भरपाई, पिक कर्ज, सिंचनाचा प्रश्न अशा अनेक सुविधा निर्माण करता येणार असून विभागीय आयुक्तांच्या त्या पत्रामुळे किनवट आणि माहूर तालुक्यातील गायरान पट्टे धारक शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मनपाची थकबाकी वसूली मोहीम तीव्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या