ईस्लापुर:वर्षभरातील सर्व सणापैकी शेतक-याचा मुख्य व मोठा सण म्हणुन मानल्या जाणारा पोळा सण आहे. यंदा पोळा सणावर कोरोना सोबतच लम्पी आजाराचे सावट असुन ईस्लापुर,जलधारा भागासह तालुक्यात बैल,गाईस होत असलेल्या लम्पी आजाराने वाडी,तांडयातील शेतकरी हैराण झाले आहेत.
यंदा माणसांना कोरोना आजाराने गेल्या सहा महिण्यापासुन वेठीस धरले असुन या कोरोना व्हायरस प्रमाणेच माणसांने माणसाच्या संपर्कात आल्यास या आजाराची जशी लागण होते. त्याच प्रमाणे एखादया जनावरांना लम्पी आजार झाल्यास आजारी जनावरांना चावलेला एखादा डास दुस-या निरोगी जनावरास चावल्यास त्यांस लम्पी आजार होत असल्याचे बोलले जात आहे.जनावरांना होणारा लम्पी आजार हा देखील व्हायरस सारखाच जनावरांचा आजार असुन या आजाराने ईस्लापुर,जलधारा परिसरासह तालुक्यातील वाडी,तांडयातील जनावरास वेठीस धरल्याने व अनेक जनावरांना हे आजार झाल्याने कोरोना पाठोपाठ या आजाराने शेतकरी हैराण झाला आहे.
बैल,गाय,वासरु या जनावरांना लम्पी आजार झाल्यास जनावरांस गुदगुदी येणे,सुज येणे,सांधे दुखी होणे,ताप येणे, जाईंट सुजने,जनावरे चारा,पाणी खाणे पिणे सोडणे हे लक्षणे दिसत आहे. या आजाराची सर्वप्रथम सुरवात ओडीशा राज्यातुन झाली असुन ओडीशा राज्या पाठोपाठ केरळ,तामीलनाडु,आंध्रप्रदेश या राज्यात देखील जनावरांना हा आजार मोठया प्रमाणावर झाला. या राज्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्यातील काही जिल्हयात देखील या आजारांची जनावरांना लागण झाली आहे.
या आजाराने जनावरांची कुठलीही जिवीतहानी होत नसुन चिकन गुनिया आजारा प्रमाणेच हा आजार आहे. या आजारांवर उपचार करण्यासाठी तालुक्यातील सर्वच पशुवैदयकिय दवाखान्यात औषधी उपलब्ध असुन हा आजार झाल्या पासुन जनावरावर प्रथम उपचार केल्या पासुन आठवडाभर उपचार केल्यास हा आजार कमी होत असल्याची माहीती जलधारा येथील पशुवैद्यकिय अधिकारी डाँ एस.पणीकर यांनी बोलतांना दिली.
संशयीत गुप्तधन टोळीचा जिंतुर शहरात पर्दाफाश